Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमआयडीसी येथील कंपनीत तरुणीचा विनयभंग करुन मारहाण

अहमदनगर : एमआयडीसीतील एका कंपनीत असलेल्या युवतीचा एका तरुणाने कंपनीत च विनयभंग करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित युवतीने एमआयडीसी प

Ahmednagar : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ Kopargaon शहरात सायकल रैली
मढी येथील मुस्लिम समाजाला संरक्षण मिळावे : ग्रामस्थांची मागणी
जामखेड तालुक्यात घरफोडी करणारी सराईत टोळी गजाआड

अहमदनगर : एमआयडीसीतील एका कंपनीत असलेल्या युवतीचा एका तरुणाने कंपनीत च विनयभंग करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित युवतीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन एका तरुणाविरूध्द विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकेस गंगाराम यादव (रा. चेतना कॉलनी, एमआयडीसी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी युवती एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला असून त्याच कंपनीत यादव काम करतो. फिर्यादी युवती कंपनीत असताना यादव तिच्याजवळ आला. त्याने युवतीची छेड काढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्याने तरूणीकडे मोबाईल नंबरची मागणी केली असता त्या तरुणीने त्याला कशाला मोबाईल नंबर पाहिजे, अशी विचारणा केली. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर युवतीने आरडाओरडा केला असता यादव याने हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला दाखवतो, असे म्हणून धमकी दिली. पीडित युवतीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला याप्रकरणी पीडित युवतीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चंद्रकेस गंगाराम यादव (रा. चेतना कॉलनी,एमआयडीसी अहमदनगर) याचे विरूध्द विनयभंग, मारहाण कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चौधरी करीत आहेत

COMMENTS