Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ४ महिलांची केली क्रूरपणे हत्या

पिथौरागढ प्रतिनिधी - उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार महिलांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही हत्या याच कुट

वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याची हत्या
आईने आपल्या दोन मुलांची केली हत्या
आईला मारहाण केल्याच्या कारणावरून मुलाने बापाचा घेतला जीव.

पिथौरागढ प्रतिनिधी – उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार महिलांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही हत्या याच कुटुंबातील एकाने केली आहे. संतोष नावाच्या मुलाने ही हत्या केली आहे हत्येनंतर फरारी असलेला संतोष अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात असून नेपाळला जाणाऱ्या सीमेवर विशेष पोलिसांचा पहारा आहे. वास्तविक शांत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिथौरागढ जिल्ह्यात एका तरुणाने पत्नी, सासू, चुलत वहिनी आणि चुलत बहिणीचा धारदार शस्त्राने गळा आवळून खून केल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान एकाच वेळी चार खून झाल्याने संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण आहे.

COMMENTS