Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

ब्राईट सोशल फाउंडेशन चा मुस्लिम आरक्षणाला जाहीर पाठिंबा

मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावे या मागणीसाठी दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एल्गार मोर्चाला विविध सामाजिक संघटना व न

महांडुळा ग्रामपंचायतीने गोरगरिबांना दिला आधारसरपंच श्री. शामद भाई शेख, ग्रामसेवक संदीप काकडे व उपसरपंच सिकंदर शेख यांच्या उपस्थितीत गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप
रांजणगाव देशमुख सोसायटीच्या अध्यक्षपदी दिघे, गुडघे उपाध्यक्ष  
जळगाव जामोद: कन्या शाळेची जागा रुग्णालयाला देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध; वंचितचाही पाठिंबा



मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावे या मागणीसाठी दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एल्गार मोर्चाला विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
ब्राईट सोशल फाउंडेशन, बीड यांच्या वतीने आयोजित या मोर्चाला सकल मुस्लिम आरक्षण कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांचाही जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या संदर्भात संस्थेच्या वतीने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक हक्कांसाठी हा लढा अत्यंत महत्त्वाचा असून, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य शासनाने मुस्लिम आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात हा एल्गार मोर्चा काढण्यात येत असून, या आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आंदोलनाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता, मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS