Homeकृषी

कराड बाजार समितीत शिराळ्यातील गूळाला 3 हजार 801 रूपये दर

कराड / प्रतिनिधी : कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दिपावलीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गूळ विक्रीचा शुभारंभ झाला. पहिल्याच सौद्यात सांगली जिल्

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन
कोपरगाव बाजार समितीच्या कार्यक्रमावर उपसभापती-संचालकांचा बहिष्कार; कार्यक्रमाचा निषेध
Dindori : अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा तोडण्याची नामुष्की (Video)

कराड / प्रतिनिधी : कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दिपावलीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गूळ विक्रीचा शुभारंभ झाला. पहिल्याच सौद्यात सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील शेतकर्‍याला पहिल्या सौद्यात 3 हजार 801 रूपयांचा उंच्चांकी दर प्रति क्िंवटलला मिळाला.
कराड बाजार समितीचे माजी उपसभापती विजयकुमार कदम, जयंतीलाल पटेल, जगन्नाथ लावंड, सचिव बी. डी. निंबाळकर यांच्या उपस्थितीत गुळाचा पहिला सौदा झाला. शिवाजी रामचंद्र पवार या अडत व्यापार्‍यांच्या दुकानात सौदा झाला. पुढील सौदा 31 ऑक्टोंबर रोजी बाजार समितीतील शिवतेज ट्रेडींग कंपनी या अडत दुकानात गुळाचा सौदा होणार आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या सौद्यात 44 क्िंवटल गुळाची विक्री होवून गुळाला सरासरी 3 हजार 501 रुपये दर मिळाला. यावेळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. शेतकर्‍यांनी गुळ मार्केटला जास्तीत-जास्त गूळ विक्रीस आणावा, असे आवाहन विजयकुमार कदम यांनी केले आहे.

COMMENTS