Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र दत्त मंदिराला जाण्यासाठी पायर्‍यांचे बांधकाम पूर्ण; 9 फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा

बीड । प्रतिनिधीबीड तालुक्यातील पाटोदा बेलखंडी येथील टेकडीवरील श्री दत्त मंदिराला जाण्यासाठी सिमेंट काँक्रीट पायर्‍यांचे बांधकाम ग्रीलसह पूर्ण झाले

वडवणीचे प्रतिष्ठित राजेसाहेब शिंदे पाटील यांचे निधन;राजेशाही व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड
Beed : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन ! (Video)
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावे समोर येतील ः मनोज जरांगे यांचा दावा

बीड । प्रतिनिधी
बीड तालुक्यातील पाटोदा बेलखंडी येथील टेकडीवरील श्री दत्त मंदिराला जाण्यासाठी सिमेंट काँक्रीट पायर्‍यांचे बांधकाम ग्रीलसह पूर्ण झाले आहे. या पायर्‍यांचे लोकार्पण सोमवार, दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता महंत श्रीधर दादा जामोदेकर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन योगेश बडगे यांनी केले आहे. पाटोदा बेलखंडी शिवारातील दत्तनगर येथील उंच टेकडीवर वसलेले प्रभू श्रीदत्त व भगवान गोपाल कृष्ण यांचे मंदिर अनेक वर्षांपासून डोंगराच्या कुशीत आहे. या मंदिरावर दर्शन घेण्यासाठी व अध्यात्मिक कार्यक्रमासाठी नेहमीच पंचक्रोशीतील भक्तांची मोठी गर्दी असते. मंदिरावरील 31व्या अखंड नामस्मरण सोहळ्यादरम्यान, राजेंद्र मस्के यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी महंत श्रीधर दादा जामोदेकर यांनी मंदिरावर जाण्यासाठी पायर्‍यांची सोय करावी असा शब्द दिला होता. अबालवृद्ध भक्त आणि वृद्ध भाविकांसाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन, महंतांच्या सूचनेनुसार राजेंद्र मस्के यांनी अवघ्या एका महिन्यात सिमेंट काँक्रीट पायरी व ग्रीलचे बांधकाम रंगरंगोटीसह पूर्ण केले आहे. या पुढाकारामुळे ग्रामस्थ आणि भक्तांनी समाधान व्यक्त केले. पायर्‍यांच्या या कामामुळे आता श्रीक्षेत्र दत्त मंदिरावर जाणे सुरक्षित आणि सोयीस्कर झाले आहे. राजेंद्र मस्के यांनी महंत व ग्रामस्थांचा दिलेला शब्द पाळत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या पायरी कामाचा लोकार्पण सोहळा 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता संपन्न होईल. सोहळ्यासाठी ग्रामस्थ, भाविक भक्त आणि पंचक्रोशीतील लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS