Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! जुन्नरमध्ये खेळता खेळता दोन चिमुकले शेततळ्यात कोसळले

https://www.youtube.com/watch?v=PpYwFZ6ohuY खेळण्या-बागडण्याच्या वयात मृत्यूने घाला घातल्याची एक अत्यंत भीषण घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर ता

धाराशिवमध्ये सुट्टीत आलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू
दिल्लीतील साकेत नगरमध्ये ३ मजली इमारत कोसळली; थरारक व्हिडिओ समोर!। लोकमंथन News२४
रिल्सच्या नादात समृद्धीवर भीषण अपघात; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी!

खेळण्या-बागडण्याच्या वयात मृत्यूने घाला घातल्याची एक अत्यंत भीषण घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून समोर आली आहे. बल्लाळवाडी येथे दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
जुन्नरमधील बल्लाळवाडी येथील ही घटना आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पवार आणि नवले कुटुंबातील दोन लहान मुले गाडेकर यांच्या शेतात खेळत होती. खेळता खेळता या चिमुकल्यांचा अंदाज चुकला आणि ती शेततळ्यात कोसळली.
बराच वेळ मुले घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली, तेव्हा ही काळजाचा थरकाप उडवणारी बाब समोर आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

COMMENTS