Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालिका दिनाचे नेत्रदीपक साजरीकरण

कोपरगाव प्रतिनिधी ः येथील शिक्षण महर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे उ

बसच्या गर्दीत वकिलाचे पैशांचे पाकीट मारले
सहकार पॅनेल अखेर अडकले सापळ्यात…?
घर मोलकरीण कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लढा उभारू – बबली रावत

कोपरगाव प्रतिनिधी ः येथील शिक्षण महर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे उत्कृष्ट साजरीकरण करण्यात आले. सदर प्रसंगी विश्‍वभारती रूरल एज्युकेशन संस्थेचे सचिव संजय नागरे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचे त्यांनी कौतुक केले. सदर प्रसंगी जिक्रा दारुवाले, शिवांगी जगताप या विद्यार्थीनींनी भाषणे सादर केली तर समृद्धी माकोणे या विद्यार्थीनीने सावित्रीबाईची भूमिका वठवत अप्रतिम एकपात्री नाटीका सादर केली. दत्ता डोखे यांनी बालिका दिनावर आपले विचार प्रस्तुत केले. मोनाली होन यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवीच्या विद्यार्थीनींनी बालिका दिनावर आधारीत  हृदयस्पर्शी नृत्याविष्कार सादर केला. या वेळी सावित्रीच्या लेकींचा अर्थात महिला शिक्षिकांचाही सन्मान करण्यात आला. प्राचार्य सुरेश शिंदे यांनी बालिका दिनाच्या शुभेच्छा देत जीवनातील स्त्रियांचे-मुलींचे महत्व आपल्या मनोगतातून मांडले. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वरा पाटील सह अंजली सिंग व नंदिनी वक्ते यांनी केले. कार्यक्रमाच्या अप्रतिम सादरीकरणाबद्दल विश्‍वभारती रुरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल आग्रवाल, उपाध्यक्ष-वनिताताई नागरे, विश्‍वस्त मनोज आग्रवाल, विश्‍वस्त आनंद दगडे, कार्यकारी संचालक-आकाश नागरे आदींनी शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतूक केले.

COMMENTS