Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात होणार 15 टक्के पाणीकपात

पुणे : पुण्यात कमी पावसाच्या अंदाजामुळे पाणीटंचाईचा धोका वाढला असून खडकवासला धरणातील पाणीसाठा टिकवण्यासाठी 15 टक्के पाणी कपातीची शक्यता वर्तवण्या

निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरले; कोपरगावच्या ग्रामस्थांकडून आमदार विवेक कोल्हे यांचे आभार
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे

पुणे : पुण्यात कमी पावसाच्या अंदाजामुळे पाणीटंचाईचा धोका वाढला असून खडकवासला धरणातील पाणीसाठा टिकवण्यासाठी 15 टक्के पाणी कपातीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा मान्सून फार काळ नसल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पाण्याच्या वापरावर होणार असल्यामुळे एप्रिल महिन्यातून जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये पाणी जपून वापरावे तसेच खडकवासला धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत शिल्लक राहील याचं नियोजन करण्याची आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे.

COMMENTS