Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरले; कोपरगावच्या ग्रामस्थांकडून आमदार विवेक कोल्हे यांचे आभार

कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव, वेस सोयगाव, अंजनापूर, बहदराबाद, बहादरपूर, मनेगाव, डांगेवाडी तसेच पंचक्रोशीतील विविध गावांमधील पाझर तलाव निळवंडे ध

दक्षिण काशी पुणतांबाच्या विकासाला गती देणार; तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार – सभापती प्रा. राम शिंदे
साधुसंतांच्या आशीर्वादाने नव्या जबाबदारीची सुरुवात : आ. कोल्हे
‘एसएसजीएम’मध्ये माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक उत्साहात; आमदार विवेक कोल्हे यांच्यासह मान्यवरांचे अभिनंदन

कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव, वेस सोयगाव, अंजनापूर, बहदराबाद, बहादरपूर, मनेगाव, डांगेवाडी तसेच पंचक्रोशीतील विविध गावांमधील पाझर तलाव निळवंडे धरणाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामस्थांनी आमदार विवेक कोल्हे यांच्याकडे पाझर तलाव भरून देण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार कोल्हे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाठपुरावा केला. त्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत परिसरातील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिले.

या निर्णयामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार असून विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. तसेच शेतकरी व नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आमदार विवेक कोल्हे यांनी नेहमीप्रमाणे जनतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने लक्ष देत तातडीने सकारात्मक भूमिका घेतली, ज्यामुळे उन्हाळ्यातील संभाव्य टंचाई टळली असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

COMMENTS