Homeताज्या बातम्यादेश

पीएफआयच्या 15 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा

भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली ः केरळमधील भाजपच्या ओबीसी नेत्याच्या हत्याप्रकरणात मावेलीक्कर जिल्हा न्यायालयाने 15 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सर्व आरो

आजोबांचा आपल्या 13 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार I LOKNews24
स्वप्नात झाला स्वामींचा साक्षात्कार… दुसऱ्यादिवशी घडला चमत्कार… श्री स्वामी समर्थ | Shri Swami Samarth Maharajanche Anubhav | LokNews24
मुंबईच्या सुशोभीकरणाच्या कामाला वेग

नवी दिल्ली ः केरळमधील भाजपच्या ओबीसी नेत्याच्या हत्याप्रकरणात मावेलीक्कर जिल्हा न्यायालयाने 15 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सर्व आरोपी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेचे सदस्य होते. शनिवारी न्यायालयाने या 15 जणांवर दोषारोप ठेवले होते. त्यानंतर मंगळवारी मावेलीक्कर जिल्हा न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
2021 साली भाजपाचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची हत्या झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आठ आरोपी प्रत्यक्ष हत्या करण्यात सहभागी होते. तर इतर आरोपींनी या गुन्ह्यात मुख्य आरोपींना मदत केली होती. केरळमधील भाजपचे ओबीसी विभागाचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची 19 डिसेंब 2021 रोजी राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. अलाप्पुझा येथील राहत्या घरात कुटुंबियांसमोरच आरोपींनी रंजीत यांना ठार केले होते. पीएफआय संघटनेवर 2022 साली बंदी घालण्यात आली होती. अजमल, अनूप, मोहम्मद अस्लम, अब्दुल कलाम ऊर्फ सलाम, सफरुद्दीन, मन्शद जसीब राजा, नवाज, समीर, नझीर, अब्दुल कलाम, झाकीर हुसैन, शाजी, नैसम आणि शेरनास अश्रफ या 15 आरोपींना जिल्हा न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. रंजीत यांच्या पत्नी लिशा यांनी या निर्णयानंतर समाधान व्यक्त केले. हे फक्त एक हत्येचे प्रकरण नाही, तर दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे. आमच्या डोळ्यादेखत माझ्या पतीवर हल्ला करण्यात आला आणि त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, असे लिशा यांनी सांगितले.

COMMENTS