Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड तालुक्यातून दोन वर्षांमध्ये 116 गुंड हद्दपार

कराड / प्रतिनिधी : गुन्हेगारांच्या टोळ्यांवर वचक राहावा, यासाठी पोलिसांनी हद्दपारीचे हत्यार बाहेर काढले आहे. कराड तालुक्यात तब्बल 116 गुंडांना हद्दपा

शेततळ्यात बुडून सख्ख्या भावंडांचा मृत्यू; पाटण तालुक्यातील रोमणवाडी येथील दुर्दैवी घटना
राष्ट्रवादीकडे नैतिकता असेल तर जागा ताब्यात द्यावी : जितेंद्र पाटील
कार्याला ’माणुसकी’चे श्राध्द; तांबवेच्या पाटील कुटुंबाने दिले मुलांना शैक्षणिक साहित्य

कराड / प्रतिनिधी : गुन्हेगारांच्या टोळ्यांवर वचक राहावा, यासाठी पोलिसांनी हद्दपारीचे हत्यार बाहेर काढले आहे. कराड तालुक्यात तब्बल 116 गुंडांना हद्दपार केले आहे. पोलीस कारवाईने तालुक्यातून हद्दपार झालेल्यांची संख्या वाढत आहे. हद्दपारीत उंब्रज पोलिसांनी बाजी मारली आहे. त्यांच्याकडून दोन वर्षांत 65 जणांना, तर कराड शहर पोलिसांकडून 47 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. कराड तालुका पोलिसांकडून अद्यापही दोन टोळ्यांचे प्रस्ताव पाठवले आहेत. तळबीड पोलीस ठाण्यातून एकही संशयित हद्दपार झाला नाही.
गुन्हेगारी अभिलेख व त्यांच्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवून कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारी टोळ्यांचे मुळावर कायदेशीर घाव घालण्यासाठी पोलिसांनी हद्दपारीच्या कारवाईची तलवार बाहेर काढली आहे. त्यामुळे त्याची धास्ती घेऊन अनेक जण भूमीगत झाले आहेत. कराड तालुक्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईने 116 जणांवर हद्दपार झाले आहेत. त्यात उंब्रज पोलिसांनी चांगलीच बाजी मारली आहे. त्या खालोखाल कराड शहर पोलिसांचीही कामगिरी चांगली आहे. तालुका पोलिसांना केवळ चौघांना हद्दपार करता आले आहे. अद्यापही दोन टोळ्यांच्या प्रस्तावावर निर्णय नाही. त्यात आठ जणांचा समावेश आहे. तळबीड पोलीस मात्र हद्दपारीच्या कारवाईला अपवाद ठरले आहेत. त्यांच्या हद्दीतून एकही संशयित हद्दपार झाला नाही. उंब्रज पोलिसांनी 60 संशयितांना हद्दपार केले आहे. त्यामध्ये ‘मोका’चे दोन प्रस्ताव, 55 ‘मपोका’चे प्रस्ताव, 11 अन्य प्रस्ताव अशा 60 जणांवर वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत हद्दपारीची कारवाई झाली आहे. अद्यापही सात प्रस्ताव बाकी आहेत. कराड शहर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांना दणका दिला आहे. दोन गुन्हेगारी टोळ्यांतील 47 जणांना हद्दपार केले आहे. शहर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांतील अनेकांवर लक्ष ठेवत त्यांना सूचना दिल्या. मात्र, त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने त्या टोळक्यांच्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शहरातील 47 जणांना दोन वर्षांत शहरातून हद्दपार केले आहे. तालुका पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांतील चार संशयितांना हद्दपार केले आहे.

COMMENTS