Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेततळ्यात बुडून सख्ख्या भावंडांचा मृत्यू; पाटण तालुक्यातील रोमणवाडी येथील दुर्दैवी घटना

पाटण / प्रतिनिधी : रोमनवाडी (येराड) येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात बुडुन सख्खा बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.याब

पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद : मनोहर शिंदे
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 733 नवीन रुग्ण
सांगलीत महापूर काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा

पाटण / प्रतिनिधी : रोमनवाडी (येराड) येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात बुडुन सख्खा बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की, रोमनवाडी येथील एका फार्म हाऊसवर कामावर असलेले सचिन जाधव (रा. रोमनवाडी) यांच्याकडे पाहुणे म्हणून अनिल पवार (रा. काठी, ता. पाटण) हे आपल्या पत्नी व दोन मुलासमवेत आले होते. सर्वजण शेततळ्याकडे गेले असता कु. सौरभ अनिल पवार (वय 16) व कु. पायल अनिल पवार (वय 14, दोन्ही रा. काठी, ता. पाटण) हे पळत शेततळ्याकडे गेले होते. सौरभ याचा पाय घसरल्याने तो तळ्यात बुडत असताना त्याला वाचवायला बहिण पायल गेली असता तीही बुडु लागली ही बाब सचिन जाधव व मुलाचे आई वडील यांना समजातच ती पळत गेली असता दोन्हीं मुलं पुर्णपणे तळ्यात बुडलेली होती.
घटनेची माहिती मिळताच पाटण पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी पायल व सौरभ यांचा शोध घेण्यासाठी मच्छिमारांना बोलवले. रात्री उशीरा दोघांचाही मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी सरपंच प्रकाश साळुंखे, गावकामगार तलाठी पी. जी. शिंदे घटनास्थळी हजर होते.
काठी (ता. पाटण) येथील अनिल पवार हे गत काही वर्षांपासून कामानिमित्त पत्नी व मुलांसमवेत विजयनगरमध्ये वास्तव्यास आहेत. मुलगा सौरभ हा रेठरे येथील आयटीआय महाविद्यालयात शिकत होता. मुलगी पायल ही विजयनगर येथील हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी सौरभ व पायल हे आई-वडीलांसह रोमनवाडी-येराड येथे पाहुण्यांकडे गेल्यानंतर त्यांच्यावर काळाने घाला घातला.

COMMENTS