Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘रिफायनरी’ विरोध पेटला

रस्त्यावर झोपून महिलांनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या

मुंबई/प्रतिनिधी ः रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतील बारसू येथे प्रस्तावित असून, या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर याचे पडसाद मं

कोरडा दुष्काळ जाहीर करा
‘या’ क्षेत्रातील लोकांचं लॉकडाऊनला संपूर्ण पाठिंबा | पहा ‘सकाळच्या ताज्या बातम्या’ | LokNews24
मन, आचरण शुध्द तरच कामही शुध्द : अजिनाथ हजारे

मुंबई/प्रतिनिधी ः रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतील बारसू येथे प्रस्तावित असून, या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर याचे पडसाद मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात देखील उमटले. मंगळवारी आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे पोलिस आंदोलन स्थळी येत असतांना आंदोलक महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांचा ताफा अडवला. यावेळी अनेक आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केली.
रत्नागिरी येथे बारसू-सोलगावमध्ये होणार्‍या रिफायनरी विरोधातील आंदोलंन चांगलेच पेटले आहे. आज आंदोलनाचा दूसरा दिवस आहे. हे आंदोनल मोडण्यासाठी तब्बल 2 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहे. काल या प्रकल्पाच सर्वे करण्यासाठी एक समिती गेली होती. या समितीला आंदोलकांनी विरोध केला. दरम्यान, काल देखील मोठा विरोध झाला. आज सकाळी आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांचा ताफा आंदोलक महिलांनी अडवून धरला. सकाळी साडे आठच्या सुमारास महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. काही ही झाले तरी तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली. मंगळवारी प्रकल्पस्थळाचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती समजल्यानंतर याला विरोध करण्यासाठी बारसू येथे अनेक आंदोलनकर्ते जमले होते.
दरम्यान, रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण चांगलेच रंगतांना दिसून येत आहे. रिफायनरीला होणारा वाढता विरोध पाहता शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनीच रिफायनरीसाठी बारसू येथील जागा सुचवली होती, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकार ल जनतेशी घेणे देणे नाही. हम करे सो कायदा अशी परिस्थिती आहे असे नाना पटोले म्हणाले. बारसू प्रकल्प झाला पाहिजे, पण कुठे झाला पाहिजे याचे काही संकेत आहेत. मी आंदोलनकर्ते आणि विरोधकांशी बोललो होतो. कोकणात पर्यावरणाचे नुकसान होत आहे. हा प्रश्‍न मी सभागृहात विचारला होता. यात एका पत्रकाराच जीव गेला. जनतेच्या मताला चिरडून टाकण्याचा काम सरकार करत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.

दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका ः अजित पवार- बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत सरकारला केली आहे.रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

कुणाची सुपारी घेऊन विरोध? ः फडणवीस- महाराष्ट्रातल्या बारसू या ठिकाणी जो प्रकल्प आणायचा आहे आणि त्यावर जो विरोध होतो तो  कुणाची सुपारी घेऊन बारसूला विरोध करत आहात ते तरी सांगा? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी रिफायनरी आहे त्यात केंद्र सरकारच्या तीन ऑईल कंपनीज एकत्रित येऊन देशाच्या इतिहासतली सर्वात मोठी गुंतवणूक करत आहेत. या गुंतवणुकीमुळे एक लाख लोकांना रोजगार कोकणात मिळणार असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

COMMENTS