Homeताज्या बातम्यादेश

देशात कोरोना रुग्णांचा पाच महिन्यातील उच्चांक

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशात कोरोना रुग्णांचा दर घटलेला असला तरी, गेल्या काही दिवसांपासून एच3एन2 या विषाणूची धास्ती वाढली होती. मात्र गेल्या काही

पोटनिवडणूक विजय आणि पीके’ ला सोनियांचा आदेश : अन्वयार्थ !
18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात
शरद पवारांची प्रकृती स्थिर

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशात कोरोना रुग्णांचा दर घटलेला असला तरी, गेल्या काही दिवसांपासून एच3एन2 या विषाणूची धास्ती वाढली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून, काल 24 तासामध्ये कोरोनाचे 1890 रुग्ण आढळून आले आहेत. हा 5 महिन्यातील उच्चांक असून, 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  यापूर्वी 28 ऑक्टोबर 2022 रोजी देशात 2,208 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 9,433 झाली आहे.
देशात शनिवारी कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यूही झाला. यापैकी केरळमध्ये 3 आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 2-2 मृत्यू झाले आहेत. दैनिक पॉझिटिव्हिटी रेट 1.56 टक्के आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 1.29 टक्के होता. सध्या महाराष्ट्र, गुजरात, केरळ, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. कोरोनाच्या शेवटच्या दोन लाटांमध्ये या राज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. त्यांनी राज्यांना कोरोना चाचणी वाढवून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि खउचठ च्या संयुक्त सल्ल्यानुसार, 10 आणि 11 एप्रिल रोजी देशभरात मॉक ड्रिलचे नियोजन केले जात आहे. यादरम्यान सरकारी आणि खासगी रुग्णालयातील तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मॉक ड्रिलची संपूर्ण माहिती 27 मार्चला येईल, असे अ‍ॅडव्हायझरीमध्ये सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. तज्ञांचे मत आहे की नवीन दइइ.1.16 व्हेरिएंट हे याचे कारण असू शकते, परंतु घाबरण्याची गरज नाही. तज्ज्ञांच्या मते, कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन करा. जर एखाद्याने बूस्टर डोस घेतला नसेल, तर त्यांनी हा डोस शक्य तितक्या लवकर घ्यावा.

COMMENTS