कडा येथील वर्धमान महावीर चॅरीटेबल ट्रस्ट संचालित महावीर इंग्लिश स्कूल या उइडए बोर्ड मान्यता प्राप्त शाळेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, जल

कडा येथील वर्धमान महावीर चॅरीटेबल ट्रस्ट संचालित महावीर इंग्लिश स्कूल या उइडए बोर्ड मान्यता प्राप्त शाळेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवनाने झाली. या प्रसंगी वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अमित राठोड, उपाध्यक्ष श्री. संदीप चानोदिया, सचिव श्री. हेमंत मेहेर, खजिनदार डॉ. प्रमोद भळगट तसेच विश्वस्त श्री. मनीष गांधी, श्री. प्रकाश श्रीश्रीमाळ, श्री. अमोल पटवा, श्री. संजय पितळे, श्री. संतोष गांधी श्री .गोकुळदासजी मेहेर , आणि श्री.पी.जी. मेहेर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.अध्यक्ष श्री. अमित राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनात शाळेच्या अठरा वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल संपूर्ण शाळा परिवाराचे अभिनंदन केले. शिक्षकांचे समर्पण, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सहशालेय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, आणि कठोर परिश्रम या मूल्यांचा अंगीकार करून जीवनात उच्च ध्येय गाठावे, असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी केले.शाळेचे प्राचार्य श्री. अभिलाष कुडियाथू यांनी आपल्या मनोगतात महावीर इंग्लिश स्कूलच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेतला. आपल्या परिसरातील अग्रगण्य सीबीएसई शाळा म्हणून झालेल्या प्रगतीचा उल्लेख करत त्यांनी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ) 2020, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून 21 व्या शतकातील सक्षम, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडविण्याचा शाळेचा संकल्प त्यांनी अधोरेखित केला.कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्याविष्कार, सामाजिक संदेश देणारे नाट्य सादरीकरण, प्रेरणादायी भाषणे, सुरेल संगीत सादरीकरण तसेच विविध कलागुणांनी परिपूर्ण कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता, शिस्त आणि सांघिक भावना प्रकर्षाने दिसून आली. त्याचबरोबर मुलांना शाळेच्या वतीने स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा मुलांनी मनसोक्त आस्वाद घेतला.महावीर इंग्लिश स्कूलच्या अठरा वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा, गुणवत्तापूर्ण, आणि सर्वांगीण शिक्षण देण्याच्या अखंड ध्यासाचा हा वर्धापन दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.

COMMENTS