Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात 1 ली ते 8 पर्यंतच्या शाळा बंद; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा

इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा सोमवार, दि. 10 जानेवारीपासून

आकडे बहाद्दरांविरुध्द महावितरणची धडक मोहीम
‘कृष्णा’च्या महिला सभासद गिरवणार अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे
बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम वर्षभराच्या बंदीनंतर भारतात पुन्हा होणार लॉन्च

इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा सोमवार, दि. 10 जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय सांगली जिल्हा प्रशासाने घेतला असल्याची माहिती, पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. इस्लामपूरातील आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, करोनाचे झपाट्याने संक्रमण होत आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता 9, 10 वीचे वर्ग सुरू राहतील. तसेच महाविद्यालये बंद आहेत. पुढील काही महिने करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. करोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करून सगळ्यानी काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे वैद्यकीय सेवेवर ताण येणार नाही. कोविड रुग्णांना बेड कमी पडू नये यासाठी आतापासून दक्षता घ्यायला हवी.

COMMENTS