एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा कधी?; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल ; आज उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा कधी?; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल ; आज उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

मुंबई : राज्यात राज्य परिवहन महामंडळांच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप सुरूच असल्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना हाल होतांना दिसून आले. राज्य परिवहन मह

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा
शाळाबाह्य बालकांसाठी ५ ते २० जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा पतीने केला दगडाने ठेचून खून I LOKNews24

मुंबई : राज्यात राज्य परिवहन महामंडळांच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप सुरूच असल्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना हाल होतांना दिसून आले. राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी जवळपास 70 एसटी आगारांमधील कर्मचारी-कामगारांकडून सुरू असलेल्या संपाचा तिढा रविवारी देखील कायम राहिला. कर्मचार्‍यांच्या मागण्यांविषयी निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात देऊनही त्याविषयी अंतिम सहमती होऊ न शकल्याने न्यायालयाने याप्रश्‍नी आज, सोमवारी सकाळी 10 वाजता पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे.
कर्मचार्‍यांची आर्थिक विवंचना वर्षानुवर्षे सुरू असून अनेकांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. म्हणून संपाचे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे स्पष्टीकरण संघटनेतर्फे करण्यात आल्यानंतर खंडपीठाने या याचिकेत राज्य सरकारला प्रतिवादी करण्यास सांगतानाच सरकारला तोडगा मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार शनिवारच्या सुनावणीत सरकारी वकील भूपेश सामंत यांनी सरकारचा प्रस्ताव मांडला. ’राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाचे व परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांची समिती स्थापन केली जाईल आणि ही समिती सर्व मागण्यांविषयी विचार करून तीन महिन्यांत शिफारस अहवाल देतील. मात्र, संघटनांनी सहकार्य करून संप तात्काळ मागे घ्यायला हवा,’ असे म्हणणे सामंत यांनी मांडले. तेव्हा, ’या प्रस्तावित समितीविषयी तात्काळ जीआर काढण्यात यावा आणि या समितीमध्ये परिवहनमंत्र्यांचाही समावेश असावा, तर हा प्रस्ताव आम्हाला मान्य असेल,’ असे म्हणणे संघटनेने अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांच्यामार्फत मांडले. त्यानंतर याविषयी सरकारकडून माहिती घेऊन सादर करता येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तिढा कायम राहत असल्याचे पाहून खंडपीठाने याप्रश्‍नी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे संकेत दिले आणि पुढील सुनावणी उद्या, सोमवारी सकाळी 10 वाजता ठेवली. एसटीचे कर्मचारी 27 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवत संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसटीच्या विलिनीकरण या प्रमुख मागणीकडे कुणी लक्ष देत नसल्याने एसटी कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातील एसटी वाहकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या संबंधित वाहकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिंगोलीत वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न
एसटी कर्मचार्‍यांचा संप राज्यातील 70 पेक्षा अधिक आगारांमध्ये आंदोलन सुरु आहे. आंदोलनाकडे कुणीच लक्ष देत नसल्याने हिंगोलीतील वाहकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रमेश टाळीकुटे अस आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या वाहकाचे नाव आहे. रमेश थोरात कळमनुरी आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात वाहकावर उपचार सुरू आहेत.

अंतिम सहमतीअभावी संप सुरूच
कर्मचार्‍यांच्या मागण्यांविषयी निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात देऊनही त्याविषयी अंतिम सहमती होऊ न शकल्याने न्यायालयाने याप्रश्‍नी आज, सोमवारी सकाळी 10 वाजता पुन्हा सुनावणी ठेवली. औद्योगिक न्यायालयाने 29 ऑक्टोबरच्या आदेशाने संप करण्यास मनाई केलेली असूनही संघर्ष एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम राहिल्याने एसटी महामंडळाने उच्च न्यायालयात तातडीची याचिका केली होती. त्यानंतर संघर्ष संघटनेने संपातून माघार घेतली. मात्र, कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेने संपाची भूमिका कायम ठेवत 59 आगारांमध्ये संप केला.

संपात सहभागी आगारांची संख्या – 70
महामंडळातील एकूण आगार – 250

COMMENTS