Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळू तस्कराचा महसूल पथकातील तलाठ्यावर हल्ला

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारातील घटना

कोपरगाव - माझ्यावर कारवाई केली तर तुम्हाला अँटी करप्शनमध्ये घालवीन अशी धमकी देत वाळू तस्कराने कारवाईसाठी गेलेल्या महसुल पथकातील तलाठ्याला काठीने

अंजली महामेर यांना नारीशक्ती साहित्य पुरस्कार प्रदान
राहुरी तालुक्यात दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण
शरद पवारांना मी मोठं मानत नाही, तुम्ही कोणी मानत असाल तर तुमचा प्रश्न; गोपीचंद पडळकरांची टीका l LokNews24

कोपरगाव – माझ्यावर कारवाई केली तर तुम्हाला अँटी करप्शनमध्ये घालवीन अशी धमकी देत वाळू तस्कराने कारवाईसाठी गेलेल्या महसुल पथकातील तलाठ्याला काठीने मारहाण करत जप्त करून घेउन चाललेला वाळूचा ढंपर पळवून नेलाय. सदरची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारात घडली आहे.    
या घटनेने कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ढंपरवरील अनोळखी चालक तसेच मारहाण करणार्‍या चौघा वाळू तस्कराविरुद्ध विवीध कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू तस्करांविरुद्ध महसूल यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्याने गोदावरी नदीपत्रातून वाळू उपसा करणार्‍या वाळू चोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. पळवलेला डंपर आणि आरोपींचा शोध शहर पोलीस घेत आहे. सध्या गोदावरी नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा होऊन चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना मिळाल्यानंतर त्यांनी महसूल विभागाचे एक पथक सोबत घेत देरडे कोर्‍हाळे परिसरात करवाई केली.तहसील कार्यालय कोपरगाव येथील पथकाने पकडलेला वाळु चोरीचा विना नंबरचा ढंपर तहसील कार्यालय कोपरगाव येथे कारवाई कामी घेवुन जात असतांना गुरुवारी सकाळी 5:45 वाजेच्या सुमारास जेऊर कुंभारी  शिवारातील एच.पी. पेट्रोल पंपा जवळ सिल्वर रंगाची स्वीप्ट डीझायर गाडी मध्ये आरोपी राजू शेख व ईतर अनोळखी इसम यांनी येवुन संगनमत करून ढंपर थांबवुन ओरोपी  राजू शेख याने फिर्यादी तलाठी प्रवीण डहाके यांना ढंपर मधुन हात धरून ढंपरच्या खाली ओढले व माझ्यावर कारवाई केली तर मी तुम्हाला अ‍ॅन्टी करप्शन मध्ये घालवीन अशी धमकी देवुन त्याचे सोबत असलेला अनोळखी आरोपी ईसमाने डहाके यांच्या हातातील मोबाईल हिसकावुन घेत असतांना त्यांनी त्यास विरोध केला असता त्याने त्याचे हातातील काठीने फिर्यादीचे ऊजव्या पायावर व ऊजव्या हातावर मारहान करून दुखापत केली व धाक दपटशा दाखवुन ढंपर मधील वाळु ही रस्त्यावरच ओतुन देवुन ढंपर घेवुन तेथुन पळुन गेले आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तलाठी प्रवीण डहाके यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजू शेख डंपरवरील अनोळखी चालक आणि इतर तिघे अशा पाच जणांविरुद्ध भादंवी कलम 353, 332,379, 143,147149,506 सह पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी कोपरगावचे तत्कालीन तहसीलदार यांना वाळूतस्करांकडून पंटर मार्फत लाच स्वीकारत असल्याचे आरोप करत एसीबीने पकडले होते. त्यांनंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सध्याचे तहसीलदार संदीप कुमार भोसले पावले टाकत असताना त्यांच्या पथकातील तलाठ्यांना अँटी करप्शनचा दम देउन वाळू तस्कर आपले वर्चस्व निर्माण करू पाहताय का? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे? तलाठी आणि इतर शासकीय अधिकारीही भ्रष्टाचारात बरबटलेले नसेल तर त्यांनाही अशा धमक्यांना घाबरण्याची काय गरज? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. मात्र वाळू तस्कराने धमकी देऊनही महसूल पथकाने चांगलाच हिसका दाखवल्याने वाळू तस्करांचे मात्र धाबे दणाणले असून महसूल पथकाच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

COMMENTS