शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी… सेन्सेक्स ६० हजारांच्या पार

Homeताज्या बातम्यादेश

शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी… सेन्सेक्स ६० हजारांच्या पार

प्रतिनिधी : मुंबई गुरूवारी BSE सेन्सेक्स ६० हजाराच्या उंबरठ्यावर पोहचला होता. गेल्या काही दिवसात तेजी पाहता आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६

तुळजाभवानी मातेच्या कमानीमुळे राहुरीच्या वैभवात भर
पिंपळस गावात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 वाहनचालकांना वाचवण्यात यश!

प्रतिनिधी : मुंबई

गुरूवारी BSE सेन्सेक्स ६० हजाराच्या उंबरठ्यावर पोहचला होता. गेल्या काही दिवसात तेजी पाहता आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६० हजारांचा विक्रमी आकडा पार करेल, 

अशी शक्यता होतीच. सेन्सेक्स ६० हजारांच्या पार गेल्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे.

गेल्या काही आठवड्यापासून शेअर बाजारात जबरदस्त तेजी सुरू आहे. तेजीची घौडदौड आजही कायम आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ६० हजारांचा विक्रमी आकडा पार केला. 

जागतिक गुंतवणूकदारांच्या वाढत्या गुंतवणुकीचा परिणाम, अमेरिकी फेडचा बॉंड संदर्भातील निर्णय, कोरोनाचा कमी झालेला संसर्ग, आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूती इत्यादीमुळे ही उसळी मिळाली.

BSE सोबतच NSEच्या निफ्टीनेही १७९०० ची ‘कॅप ब्रेक’ केली. मार्केट सुरू होताच निफ्टीने १८२०० अंकांची ऐतिहासिक उसळी घेतली होती.

आज कमाई करणाऱ्या पहिल्या दहात इंफोसिस, HCLTECH, TECHM, HDFCBANK, TCS, ASIANPAINT, INDUSINDBK, LT आणि ICICIBANK च्या शेअर्सचा सामावेश आहे.

सेन्सेक्सने ५० हजाराचा टप्पा २२ जानेवारीला ओलांडाला होता तर अवघ्या २७२ दिवसात १० हजार अंकांची उसळी घेतली आहे.

COMMENTS