सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 497 रुग्ण; उपचारादरम्यान 9 बाधितांचा मृत्यू

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 497 रुग्ण; उपचारादरम्यान 9 बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 497 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

ज्येष्ठ नागरिक संघाकडून सहकार्याचे कौतुक..!
मांडओहोळ धरण भरले, धबधबे सुरु – पर्यटकांचे आकर्षण ठरणार
सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 497 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच उपचारादरम्यान 9 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 15 (8505), कराड 106 (27265), खंडाळा 16 (11739), खटाव 73 (19457), कोरेगांव 35 (16690), माण 23 (13130),  महाबळेश्‍वर 12 (4275), पाटण 22(8393), फलटण 36 (28319), सातारा 135 (40241), वाई 17 (12605) व इतर 7 (1312) असे आज अखेर एकूण 1 लाख 91 हजार 931 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 0 (192), कराड 3(801), खंडाळा 0 (149), खटाव 3 (484), कोरेगांव 0 (382), माण 1 (260), महाबळेश्‍वर 0 (45), पाटण 1 (196), फलटण 0 (280), सातारा 1 (1225), वाई 1 (331) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4 हजार 345 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.

COMMENTS