Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगामी निवडणुकांमध्ये एकी कायम दाखवा : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे आवाहन

पाचगणी / वार्ताहर : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्हा शरद पवार, राष्ट्रवादीच्या पाठीशी जसा अभेद्य उभा होता, त्या पध्दतीनेच आगामी न

मायणीच्या यशवंत विकास सोसासटीत गुदगे गटाकडून येळगावकर गटाचा धुरळा
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 10 दिवसांत काढण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वेच्या विस्तारीकरणाबाबत बैठक

पाचगणी / वार्ताहर : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्हा शरद पवार, राष्ट्रवादीच्या पाठीशी जसा अभेद्य उभा होता, त्या पध्दतीनेच आगामी निवडणुकांतही सर्वांनी ही एकी कायम दाखवावी, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी केले.
भिलार या पुस्तकांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, बाबूराव संकपाळ, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, बाळासाहेब सोळस्कर, महिला अध्यक्षा विमल पार्टे, नारायण बिरामणे, महादेव दुधाणे, सरपंच शिवाजी भिलारे, राजेंद्रशेठ राजपुरे, प्रवीण भिलारे उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, सध्या सत्ताकेंद्रे ही व्यक्ती केंद्रित करण्याचे राजकारण सुरू आहे. देशासाठी हे घातक आहे. गैरमार्गाने सत्ता मिळवून एकत्र बसलेल्या राजकारण्यांकडे कसलेही विकासाचे धोरण नाही. एक वर्ष झाले तरी पालिका निवडणुका होत नाहीत. प्रशासक असल्याने विकास कसा होणार? हे जनता व राज्याला अधोगतीकडे नेणारे सरकार आहे.

COMMENTS