विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी आतूर

Homeमहाराष्ट्रसातारा

विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी आतूर

कोरोनामुळे यंदाही आषाढी वारीला वारकर्‍यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे  वारकर्‍यांचा हिरमोड झाला आहे.

Beed : गेवराईत दोन दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान
नंदुरबारला साकारणार आदिवासी क्रीडा प्रबोधिनी
छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त लेझीम स्पर्धेचं आयोजन

पाटण / प्रतिनिधी : कोरोनामुळे यंदाही आषाढी वारीला वारकर्‍यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे  वारकर्‍यांचा हिरमोड झाला आहे. कारण याही वर्षी शासनाने कोरोनाचे कारण देत फक्त मानाच्या दहा दिंड्याना परवानगी तेही एसटी बसने ठराविक वारकर्‍यांच्यासह दिली आहे. त्यामुळे यंदाही वारकर्‍यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचं थेट दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे समस्त वारकर्‍यांचा हिरमोड झाला आहे. आता शासनाने गाव पातळीवर गावातील मंदीर व परिसरात किमान पन्नास माणसाच्या उपस्थितीत गावातल्या गावात अष्टमी ते बारशीपर्यंत दिंडी सोहळा काढणेस तसेच भजन किर्तनास परवानगी द्यावी, अशी मागणी वैष्णव वारकरी दींडी सोहळ्याचे ह. भ. प. आनंदराव महाराज देसाई चाफळकर यांनी केली आहे.

यावर्षीही कोरोनामुळे पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याऐवजी मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचे नियोजन सरकारने केले आहे. वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार आहे. एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे. यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात शासन आदेश निघाला असून पायी वारीला मंजूरी न देण्यावर शासन ठाम आहे. 

मानाच्या 10 पालखी सोहळ्यांच्या प्रस्थान सोहळ्याबाबत शासनाच्या आदेशात म्हटले आहे की, देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 तर उर्वरित 8 सोहळ्यांसाठी 50 वारकर्‍यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तर पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे. तर नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. या सर्व बाबींतून सर्वसामान्य वारकर्‍यांमध्ये निराशा पसरली आहे. समस्त वारकर्‍यांचा हिरमोड झाला आहे. नैराश्याच्या गर्देत गेलेल्या वारकर्‍यांना मायबाप सरकारने सहानभूतीने विचार करून किमान अष्टमी ते एकादशी बारशी दिवशी 50 वारकर्‍यांची संख्या निश्‍चित करून गावातल्या गावांत दींडीसह भजन किर्तनास परवानगी द्यावी व हिरमोड झालेल्या वारकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी हभप देसाई महाराज चाफळकर यांनी केली आहे.

COMMENTS