Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायासंदर्भातील वक्तव्याने धीरेंद्र शास्त्रींवर संताप

नागपूर : सततच्या युद्धामुळे थकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडे आपले राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा बागेश्‍वर

गायकवाड यांची भंपकगिरी इतिसाच्या अज्ञानातून !
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हायव्होल्टेज ड्रामा प्रवेश नाकारल्याने शिवसेना कार्यकर्त्यांचे आंदोलन
संगमनेरात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
Congress Fury: Vadettiwar Slams Dhirendra Shastri for Shivaji Maharaj Insult

नागपूर : सततच्या युद्धामुळे थकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडे आपले राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा बागेश्‍वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्‍वर बाबा यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूरमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी असा दावा केला की, सततच्या युद्धांमुळे थकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले राज्य समर्थ रामदास स्वामींकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, रामदास स्वामींनी त्यांना पुन्हा राज्यकारभार स्वीकारण्याचा सल्ला दिला, असा प्रसंग त्यांनी कथन केला. इतिहासकारांमध्ये आधीपासूनच शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या प्रत्यक्ष भेटीबाबत मतभेद आहेत. अशा परिस्थितीत या नव्या दाव्यामुळे वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही तज्ज्ञ या कथनाला प्रेरणादायी संदर्भ मानतात, तर काहीजण याकडे ऐतिहासिक पुराव्यांअभावी संशयाने पाहत आहेत. हा कार्यक्रम नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात आयोजित करण्यात आला होता. भारतदुर्गा मंदिराच्या शिलान्यासानंतर आयोजित धर्मसभेत विविध धार्मिक आणि सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात आले. या सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत शिलान्यास पार पडला.
आपल्या भाषणात बागेश्‍वर महाराजांनी कर्तव्य, नेतृत्व आणि जबाबदारी यांवर विशेष भर दिला. त्यांनी सांगितलेल्या कथेतून संकटाच्या काळातही आपली जबाबदारी टाळू नये, हा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचाही उल्लेख केला. संकटकाळात संघाचे कार्यकर्ते पुढे येतात, असे सांगत त्यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले.

चार मुलं जन्माला घालून एक संघाला द्या
याच वेळी चार मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक संघासाठी द्या असे आवाहनही त्यांनी केले. या विधानामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकूणच, या कार्यक्रमातील भाषणातून ऐतिहासिक संदर्भ, धार्मिक विचार आणि सामाजिक संदेश यांचा संगम साधण्याचा प्रयत्न झाला असला, तरी काही विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भोंदूवर कठोर कारवाई करा : वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बागेश्‍वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर तीव्र टीका करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे. शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून दिली. त्यांनी नमूद केले की, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही आणि इमादशाहीसह मोगल तसेच इंग्रज, डच आणि फ्रेंच सत्तांनाही शिवरायांच्या पराक्रमापुढे नतमस्तक व्हावे लागले होते. असा जाज्वल्य इतिहास असताना सार्वजनिक मंचावरून शिवरायांच्या कार्याचे अवमूल्यन करणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS