वाहतूक अडली सुवेझमध्ये ; झळ भारतीयांच्या खिशाला

Homeताज्या बातम्यासंपादकीय

वाहतूक अडली सुवेझमध्ये ; झळ भारतीयांच्या खिशाला

जगात एखाद्या कोप-यात घडणा-या छोट्या, मोठ्या गोष्टींचा परिणाम जगातील दुस-या टोकाच्या देशावर होत असतो. ग्रीससारख्या छोट्याशा देशातील आर्थिक संकटाचा परिणाम जसा जगावर झाला, तसाच परिणाम आता सुवेझ कालव्यात अडकलेल्या जहाजामुळं भारतावर झाला आहे.

प्रेग्नेंट असून दीपिकाने केला डान्स
धनंज येथील सात एकर मधील सोयाबीन पीक करपले
बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू साठ्यावर कोतवाली पोलिसांची धाडसी कारवाई

जगात एखाद्या कोप-यात घडणा-या छोट्या, मोठ्या गोष्टींचा परिणाम जगातील दुस-या टोकाच्या देशावर होत असतो. ग्रीससारख्या छोट्याशा देशातील आर्थिक संकटाचा परिणाम जसा जगावर झाला, तसाच परिणाम आता सुवेझ कालव्यात अडकलेल्या जहाजामुळं भारतावर झाला आहे. भारताच्या निर्यातीला झळ बसली आहे. शेतक-यांना द्राक्ष आणि कांदा निर्यातीतून कम पैसे मिळणार आहेत. आशिया आणि युरोप खंडाला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून सुवेझ का

लव्याकडं पाहिलं जातं. हा कालवा जलवाहतुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. या कालव्यामुळं सात हजार किलोमीटरचं अंतर कमी झालं. सुवेझ कालवा सागरी मालवाहतुकीचा कणा समजला आतो. सुवेझ कालव्यामुळं आशिया आणि युरोप खंडातील जलवाहतूक शक्य झाली. जगभरातील व्यापाराच्या 12 टक्के मालाची  वाहतूक सुवेझ कालव्यातून होते. या कालव्यातील वाहतूक काही कारणानं ठप्प झाली, तर त्याची किंमत जगाला मोजावी लागते. आताही तसंच झालं आहे. चीनहून नेदरलॅंडला जाणारं मालवाहू जहाज सुवेझ कालव्यात अडकलं. हे जहाज बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सात दिवसांपासून हे जहाज काढण्याचा प्रयत्न होत आहे; परंतु त्यात यश न आल्यानं दररोज सुमारे साडेसात हजार कोटी  रुपयांचा फटका बसतो आहे. या मार्गावर समुद्री वाहतूक करणा-या शेकडो जहाजांची रांगच लागली आहे. याचा थेट परिणाम भारतावरही होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय द्राक्षे, कांदे अडकून पडले आहेत. एकाच वेळी हा माल नंतर बाजारपेठेत जाणार असल्यानं शेतक-यांना अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता नाही. द्राक्ष, कांद्यांचे दर कोसळले आहेत. भारतानंही यावर चारसुत्री उपाययोजना केली आहे. सुएझ कालव्याची वाहतूक ठप्प झाल्यानं आतापर्यंत उत्तर आणि दक्षिण भागात एकूण दोनशेपेक्षा अधिक जहाजं रांगेत उभी आहेत. यात दररोज 60 जहाजांची भर पडत आहे. ही वाहतूक कोंडी संपायला आणखी एक आठवड्याचा वेळ लागण्याची शक्यता आहे. कार्गोच्या प्राधान्यानुसार एफआयईओ, एमपीईडीए आणि अपेडा संयुक्तपणे खराब होणाऱ्या कार्गोंची ओळख पटवतील आणि त्यांच्यासाठी शिपिंग लाईनसोबत काम करतील. या संकटाच्या काळात किमतीत वाढ न करता दर स्थिर ठेवावेत असं आवाहन शिपिंग लाईनला करण्यात आलं. बंदरं आणि जलमार्ग मंत्रालयानं या बंदरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सुएझ कालव्यातील अडकलेलं महाकाय जहाज काढण्याचं काम सुरूच आहे. विशेष म्हणजे या जहाजावर बहुतांश कर्मचारी हे भारतीय आहेत. तसंच जहाजाची कप्तान इजिप्तची आहे. सुएझ कालवा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडतो. हा कालवा 193.3 किलोमीटर लांबीचा आहे. त्याचं बांधकाम 1869 मध्ये झालं. सुएझ कालव्याचं एक टोक उत्तरेला बुर सैद शहराजवळ आहे, तर दक्षिणेकडील टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ आहे. सुएझ कालव्यामुळं युरोप आणि आशिया या दोन खंडांमधील सागरी वाहतूक कमी वेळेत वेगानं करणं शक्य झालं. सुएझ कालवा सुरू होण्याआधी युरोपातून आशियाकडं जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला जवळपास सात हजार किलोमीटर लांब वळसा घालून जावं लागायचं; मात्र हा कालवा झाल्यानं हे सात हजार किलोमीटर अंतर कमी होऊन 193.3 किलोमीटर झालं.

पुढील तीन ते पाच दिवस अशीच परिस्थिती राहिली, तर जगभरातील व्यापारावर याचा मोठा परिणाम होण्यास सुरुवात होईल. मालाची ने-आण थांबल्यानं महागाई वाढण्याची शक्यता आहे. सुवेझ कालवा बंद झाल्यानं कच्च्या तेलाच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या. सुवेझ कालवा सुरू होण्याच्या अगोदर पूर्व आणि पश्चिमेच्या देशातून ये-जा करणारी मालवाहतूक करणारी जहाजं दक्षिण अफ्रिकेच्या केप-ऑफ-गुड होपला वळसा घालून प्रवास करत.  सुवेझ कालव्यात अडकलेल्या या जहाजांवर अन्न, सिमेंट तर, टॅंकर्समध्ये पेट्रोलियम पदार्थ आहेत. जनावरांचा चारा आणि पाणी नेणारे टॅंकर्सही अडकून पडले आहेत. सुवेझ कालव्याची भौगोलिक परिस्थिती पहाता, याला ‘चोक पॉइंट’ म्हणून ओळखलं जातं. एका अंदाजानुसार, सुवेझ कालव्यातून दरवर्षी 19 हजार जहाजातून 120 कोटी टन मालाची ने-आण केली जाते. लॉईट्स लिस्टच्या माहितीनुसार, सुवेझ कालव्यातून दररोज 9.5 अब्ज मूल्य असलेली जहाजं ये-जा करतात. जाणकारांच्या माहितीनुसार, सुवेझ कालवा जगभरातील मालाची ने-आण करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. 55 हजार टीयूई (कंटेनर क्षमता) मालाच्या हिशोबानं दोन दिवसांत आशियाहून युरोपला जाणारा 110 टीयूई माल अडकून पडला. सुवेझ कालवा परत सुरू झाल्यानंतर ही जहाजं एकत्र युरोपातील बंदरात पोहोचतील. त्यामुळं बंदरात गर्दी होईल. त्याचा परिणाम जहाजं खाली होण्यास वेळ लागू शकतो. बाजारात विकला जाणारा माल, पुरवठा आणि किंमतीवर याचा परिणाम होईल. सुवेझ कालवा बंद झाल्याचे गंभीर परिणाम जगभरात पाहायला मिळू शकतात. सुवेझ कालवा बंद झाल्यानं मालवाहू जहाजं आणि तेलाचे टॅंकर युरोपमध्ये जेवण, इंधन आणि तयार माल पोहोचवू शकले नाहीत. सुवेझ कालवा पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसची ने-आण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. याचं कारण, मध्यपूर्वेच्या देशातून युरोपात इंधन आणलं जातं. गेल्यावर्षी सुवेझ कालव्यातून 5163 टॅंकरची वाहतूक झाली होती. अमेरिकेच्या ईआयएच्या माहितीनुसार, सुवेझ कालवा आणि सुमेड पाईपलाईनच्या माध्यमातून सागरी मार्गानं होणाऱ्या तेलाच्या व्यवहारातील नऊ टक्के आणि आठ टक्के नॅचरल गॅसची ने-आण होते. या समस्येचा परिणाम काही कालावधीसाठी दिसून येईल; पण सुवेझ कालवा जास्त दिवस बंद राहिला, तर महागाई वाढेल. याचा परिणाम जास्त दिवस दिसून येईल. अडकलेल्या जहाजांवर लाखो डॉलर्सचं सामान आहे. सुवेझ कालवा सुरू झाला नाही, तर जहाजांना दुसऱ्या रस्त्यानं जावं लागेल. याचा अर्थ, जास्त वेळ आणि किंमत मोजावी लागणार. वाढलेली किंमत सामान्यांकडून वसूल करण्यात येईल. 2015 मध्ये सुवेझ कालवा रुंद करण्यात आला; पण या कालव्यातून वाहतूक मोठी आव्हानात्मक आहे. कालव्याची रुंदी लक्षात घेऊन जहाजं नीट चालविली नाहीत, तर वाहतूक कोंडी आणि जगाला झळ असं समीकरण कायम राहील.

COMMENTS