मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी बोलते करावे ; फडणवीस यांची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी बोलते करावे ; फडणवीस यांची मागणी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या घटना समोर येत आहेत.

पावसाळ्यापूर्वी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम पूर्ण करावे- मंत्री छगन भुजबळ
महानगरपालिका क्षेत्रात, दिव्यांगाच्या दारी अभियान सर्वेक्षणास प्रारंभ
राहुरी तालुक्यातील गुहा येथील मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायावर छापा

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या घटना समोर येत आहेत. त्या अत्यंत चिंताजनक आहेत आणि त्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मौन तर अधिकच चिंताजनक आहे; मात्र या घटनांवर ते बोलत नसतील, तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 

फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यानंतर फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीने संपूर्ण नैतिकता पायदळी तुडवली आहे. केवळ सत्तेसाठीच हे सर्व सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या. त्यात त्यांनी केवळ गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम केले, तर काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि राज्यात काही वेगळेच बोलतात. त्यांची काहीही भूमिका नाही. तसेच, आम्ही राज्यपालांना वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री हे प्रमुख आहेत. या विषयांवर त्यांनी बोलायला हवे; मात्र त्यांना माहीत आहे, की या मुद्द्यांवर बोलणे अवघड आहे. यावर बोलले तर याची चौकशी करावी लागेल. त्याची चौकशी त्यांना करायची नाही. सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व सुरू आहे, अशी टीका करून फडणवीस म्हणाले, की दिल्लीत काल जाऊन जो अहवाल दिला, तो लवंगी फटका होता की, मोठा बॉम्ब होता, हे लवकरच समोर येईल. तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? 25 ऑगस्ट 2020 पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमके कोण यात लिप्त आहेत, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत अधिकृत व्यक्ती नाहीत. ते काही सरकारी व्यक्ती नाहीत. त्यांचे वक्तव्य सरकारचे अधिकृत मानले जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत, की त्यांच्या सर्व प्रश्‍नांना उत्तरे द्यायला हवीत, असे फडणवीस या वेळी म्हणाले. फडणवीस यांनी दिलेल्या अहवालात सरकारबद्दल काहीही चुकीचे नाही. आपण तो अहवाल वाचावा. या कागदाची काय दखल घ्यायची ते मुख्यमंत्री ठरवतील.फडणवीस यांनी जी काही कागदपत्रे दिली, त्यात काडीचाही दम नाही. विरोधी पक्षनेते म्हणे काही बॉम्ब वगैरे घेऊन आले होते; पण तो बॉम्ब नसून भिजलेला लवंगी फटका आहे, अशी टीका राऊत यांनी केली होती. 

COMMENTS