मुख्यमंत्री शाह, मोदींचे धरतात पाय ; राहुल गांधी यांची अण्णाद्रमुक व भाजपवर टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री शाह, मोदींचे धरतात पाय ; राहुल गांधी यांची अण्णाद्रमुक व भाजपवर टीका

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पाय धरतात, त्यांच्यासमोर झुकतात, ते पाहून वाईट वाटते”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजप आणि अण्णाद्रमुकवर टीका केली.

दहा महिन्यांच्या बाळाचा बादलीत पडून मृत्यू
वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र – राज्यपाल रमेश बैस
शासनाच्या आनंदाचा शिधामध्ये 55 लाखांचा घोटाळा

चेन्नईः तामिळनाडूचे मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पाय धरतात, त्यांच्यासमोर झुकतात, ते पाहून वाईट वाटते”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजप आणि अण्णाद्रमुकवर टीका केली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान कंट्रोल करतात आणि मुख्यमंत्री निमूटपणे त्यांचे पाय धरतात, हे मी स्वीकार करू शकत नाही, असेही राहुल यांनी म्हटले. 

“मी एक फोटो पाहिला आहे. ज्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी शाह यांच्या पाया पडत आहेत. हा प्रकार भाजपमध्येच होऊ शकतो, जिथे तुम्हाला भाजप नेत्यांचे पाय धरावे लागतात. जिथे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासमोर सर्वांना झुकावं लागते”, अशी टीका त्यांनी केली. मी पंतप्रधानांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करताना पाहतो. मुख्यमंत्र्यांनी निमुटपणे त्यांचे पाय धरलेले पाहिले आहे. मी हा प्रकार स्वीकारला तयार नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनाही शाह यांच्यासमोर झुकायला आवडत नाही; पण त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांचाही नाईलाज आहे”, अशा शब्दात राहुल यांनी अण्णाद्रमुकवर टीकास्त्र डागले. राहुल यांनी आज चेन्नईमध्ये काँग्रेस उमेदवार हसन हारुन यांच्या समर्थनात प्रचारसभा घेतली. हसन हारुन हे वेलाचेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

COMMENTS