रोटरी क्लब शेवगाव आयोजित सूर नवा ध्यास नवा दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न

Homeअहमदनगर

रोटरी क्लब शेवगाव आयोजित सूर नवा ध्यास नवा दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न

अमरापूर प्रतिनिधी- रोटरी क्लब व इनरव्हील क्लब शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रम बहारदार भावगीतांच्या स्वरात साजरा करण्

अहमदनगर शहरात स्वच्छतेचा बोजवारा… कचरा महापालिकेत आणून टाकण्याचा इशारा
अहमदनगर शहरात दहशतीचे वातावरण… सावेडीत जागा खाली करण्यासाठी गुंडांची दहशत
राहत्या पालात तलावाचे पाणी शिरलेल्या आदिवासी बांधावांना मदत

अमरापूर प्रतिनिधी-

रोटरी क्लब व इनरव्हील क्लब शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रम बहारदार भावगीतांच्या स्वरात साजरा करण्यात आला.यावेळी भक्तीगीत,गझल,सुफी अशा विविध गाण्यांनी शेवगावकर रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.

         सूर नवा ,ध्यास नवा हा दिवाळी पहाट कार्यक्रम टीव्ही कलाकार,संगीत सम्राट रविंद्र खोमणे आणि सहकलाकार यांनी स्वराज मंगल कार्यालयात उपस्थितांसमोर सादर केला.

         कार्यक्रमाचे प्रायोजक लाहोटी ज्वेलर्सचे संचालक रो.प्रवीण लाहोटी आणि सह प्रायोजक विशाल मोबाईल असोशिएटचे विशाल पिसाळ होते.यावेळी रोटरी क्लबच्या वतीने द्वारकानाथ लाहोटी,सुरेखा लाहोटी व विशाल पिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.

         कार्यक्रमाप्रसंगी इनरव्हील क्लबच्या वतीने 16000 रु.किंमतीचे वाशिंग मशीन आणि 8000 रु.किंमतीचा किराणा व फराळ तसेच प्रवीण लाहोटी यांनी इ-लर्निंग सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर उचल फाऊंडेशनचे सचिन खेडकर यांच्याकडे सुपूर्त केला.

           यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, सचिव किसनराव माने,खजिनदार काकासाहेब लांडे,इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ.मनीषा लड्डा,माजी सहप्रांतपाल संजय लड्डा, माजी अध्यक्ष रो.भागनाथ काटे,डॉ.गणेश चेके,अण्णासाहेब दिघे,डॉ.विकास बेडके,स्नेहलता लबडे,विजयकुमार मुधोळकर,डॉ.आशिष लाहोटी,मनेष बाहेती,डॉ.पुरुषोत्तम बिहाणी,डॉ.दिनेश राठी,कारभारी नजन,डॉ.सुयोग बाहेती,डॉ.हरिश्चंद्र गवळी,वसुधा सावरकर,डॉ.पल्लवी घनवट,अश्विनी गवळी,सुनीता गवळी,पूजा धूत,शिवाजीराव काकडे,हर्षदाताई काकडे,संजय फडके,सागर फडके,बंडूशेठ रासने, जुगलकिशोर वधवा,योगेश बाहेती,सुधाकर जावळे,सुनील काकडे,प्रा.पी.आर.गणगे,रघुनाथ लबडे,सुरेश पाटेकर,डॉ.सुभाष बाहेती,पुरुषोत्तम राठी,योगगुरू संदीप चौगुले,डॉ.अभिजित वराडे,ऍड.अभिजित काकडे,डॉ.योगेश बाहेती,प्रतीक्षा बेडके,देविदास बोडखे,संजय बोरुडे,राजीव रसाळ,राजू तरटे,संतोष ढाकणे,प्रदीप बोरुडे,महेश लाडणे आदी उपस्थित होते.इन्ट्रॅक्ट क्लब अमरापूर आणि रोटरी व्हिलेज क्लब अमरापूरचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी शेवगावमधील कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब चौधरी,सुत्रसंचालन प्रा.दिलीप फलके तर आभार डॉ.काकासाहेब लांडे यांनी मानले.

COMMENTS