राज्यात भाजपने मारली बाजी… मात्र, महाविकास आघाडी मिळून जिंकले जास्त उमेदवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात भाजपने मारली बाजी… मात्र, महाविकास आघाडी मिळून जिंकले जास्त उमेदवार

प्रतिनिधी : मुंबई राज्यात झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. सहा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये भाजपने आपले वर्चस्व अस

लातूर पोलीस दलात अत्याधुनिक 15 चारचाकी वाहने दाखल
राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे
ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी विरोधक एकत्र

प्रतिनिधी : मुंबई

राज्यात झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. सहा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये भाजपने आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. 

विशेष म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. एकूण ८५ जागांपैकी एकट्या भाजप २३ ठिकाणी विजयी झाली आहे. 

तर शिवसेनेला फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी, काँग्रेसला प्रत्येकी १७ जागा मिळाल्या आहेत, तर इतर पक्षांनी १६ ठिकाणी विजय मिळवला.

भाजपला मिळालेल्या यशानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. आज काँग्रेसला नवसंजिवनी मिळाली आहे. 

जो पक्ष दुर्लक्षिला गेला होता त्यांना महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळाल्यानं त्यांना नवसंजिवनी मिळाली, असेच म्हणावं लागेल. 

महाविकास आघाडीत शिवसेनेची अत्यंत दयनीय अवस्था आहे त्यांना चौथ्या क्रमांकावर जावं लागलं. भाजप मजबूत आहे. त्यांना तिघांना मिळून टक्कर द्यावी लागत आहे. 

एकाने टक्कर द्यायचं ठरवलं तर त्यांची काय अवस्था होईल याचा त्यांनी विचार करावा, असा टोला दरेकरांनी लगावलाय. भाजपला सहा जिल्ह्यात जी मतदानाची टक्केवारी मिळाली आहे, त्याच्या आसपासही कुणी नाही, असंही दरेकर म्हणाले.

COMMENTS