Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार ः उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर देखील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. नुकतीच गुरुवारी

राज्यात राज्यपाल बदलाचे वारे
जलयुक्त शिवारातून शेतकर्‍यांचे सक्षमीकरण
फडणवीसांची ती ऑफर…रस्त्यातील नमस्कारासारखी…

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर देखील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. नुकतीच गुरुवारी उशीरा रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून मुंबईत रात्री दोन वाजता परतले. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याची माहिती असून, जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे सरकारमधील दोन मंत्रिपदांना डच्चू मिळणार असल्याचे देखील चर्चा सुरू आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला असून, जुलै महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ घेतील, अशी महत्त्वपूर्ण माहितीफडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर असून, ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे. बैठकीबाबत माहिती देतानाफडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्‍न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू. दरम्यान, भाजपश्रेष्ठी शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तार करताना या मंत्र्यांची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय राऊत यांनीही शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल, असा दावा केला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, ज्यांना कोणतीही बातमी मिळाली नाही, तेच लोक अशा बातम्या पेरतात. यात कोणतीही विश्‍वासार्हता नाही. शिंदे गटाच्या दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत, असे वक्तव्य केले. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, हे आम्हाला माहिती नाही. केंद्राच्या व राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त इंटरेस्ट आहे. येत्या 4-8 दिवसांत राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे महत्त्वपूर्ण विधान शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे.

शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची नावे? – शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदे मिळणार असून, त्यात एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याचे समजते. त्याचबरोर राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात भरत गोगवले, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक, बच्चू कडू, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील शिवसेनेच्या या आमदारांना मंत्रिपद मिळण्यची शक्यता व्यक्त करण्यात आहे.

COMMENTS