Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजीबाई बजावणार  मतदानाचा हक्क

धुळे प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यात होत असलेल्या चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांपैकी आज दि २८ रोजी धुळे व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार स

जळकोट तालुक्यातील शेतक-यांचे डोळे आकाशाकडे
रत्नागिरी – नागपूर महामार्गांवर बोलेरो आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची धडक
मोहोळजवळ अपघातात चार महिला भाविकांचा मृत्यू; सहा जण जखमी

धुळे प्रतिनिधी – धुळे जिल्ह्यात होत असलेल्या चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांपैकी आज दि २८ रोजी धुळे व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून सकाळ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाचा अधिकार बजाविण्यासाठी निकुंबे गावातील चक्क ९३ वर्षाच्या आजीबाई मतदान केंद्रात पोहचल्या आहेत. त्यामुळे ह्या ९३ वर्षीय आजीबाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान सकाळी प्रक्रिया सुरु झाली आहे. यावेळी जोतो आपल्यापल्या परिने मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचत आहे. यादरम्यान चक्क ९३ वर्षाच्या आजीबाई मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचल्या. धुळे तालुक्यातील निकुंबे गावातील सोजाबाई वेडू पाटील या ९३ वर्षाच्या आजीबाई ह्या सेवा सोसायटीच्या मतदार संघाच्या सदस्य आहेत. त्या धुळे शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात आपल्या मुलासोबत आज सकाळी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा अधिकारी बजविण्यासाठी पोहचल्या. आजीबाईंचे वय बघून उपस्थित सर्वचजण चक्कीत झाले. मतदानाचा हक्क जविण्यासाठी आजीबाई थेट मतदान केंद्रापर्यंत पोहचल्यामुळे आजीबाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS