Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर पोलीस दलात अत्याधुनिक 15 चारचाकी वाहने दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुपूर्द

लातूर प्रतिनिधी - जिल्हा पोलीस दलाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक 15 चारचाकी वाहने शुक्रवारी सुपूर्द करण्यात आली. जिल्ह

राज ठाकरे भाजपसोबत येतील हा विश्‍वास ः फडणवीस
एकीकडे टीका, दुसरीकडे एकाच गाडीतून प्रवास
एक अजित पवार ७२ तासांत सटकले.. तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार?

लातूर प्रतिनिधी – जिल्हा पोलीस दलाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक 15 चारचाकी वाहने शुक्रवारी सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या 1 कोटी 24 लाख रुपये निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. विविध कार्यक्रमांसाठी तुळजापूरकडे रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यावेळी उपस्थित होते. लातूर पोलीस दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली 15 चारचाकी वाहनांमुळे ”डायल 112” अंतर्गत पूल प्राप्त तक्रारीची दखल घेवून गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहचण्यास उपयोग होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यास मदत होणार आहे.

COMMENTS