मागासवर्गीय ग्रामस्थांची समशान भूमीची जागा हडप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी – अशोक गायकवाड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मागासवर्गीय ग्रामस्थांची समशान भूमीची जागा हडप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी – अशोक गायकवाड

अहमदनगर (प्रतिनिधी)-   मौजे देडगाव ता. नेवासा येथील मागासवर्गीय यांची गट नंबर १ या सरकारी जागा असून सदर गट नंबर हा पूर्वीपासून मागासवर्गीय समशान भ

नवरात्र उत्सवात केडगाव देवीच्या मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास परवानगी द्यावी
ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण… महापौरांच्या प्रभागात पाण्याचे संकट
‘ऑक्सिजन पार्क’मधील ऑक्सिजन गायब… नागरिक आंदोलनाच्या तयारीत

अहमदनगर (प्रतिनिधी)-  

मौजे देडगाव ता. नेवासा येथील मागासवर्गीय यांची गट नंबर १ या सरकारी जागा असून सदर गट नंबर हा पूर्वीपासून मागासवर्गीय समशान भूमी साठी प्रत्यक्ष वापरात आहे व तसेच महसूल रेकॉर्ड ऑफ राईटला व ग्रामपंचायत रेकॉर्ड ला नोंदी आढळून येत आहे अशा परिस्थितीत असताना काही समाजकंटकांनी समस्त देडगाव येथील मागासवर्गीयांचे धार्मिक भावना दुखावून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे बेकायदेशीर कृत्य करून व गावातील शांती भंग होईल असे कृत्य केले आहे 

गट नंबर १ या सरकारी जागा असून ती सरकारी असल्याबाबतची स्पष्टपणे महसूल दप्तरी ७/१२ नोंद आहे असे असताना त्यात संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी न घेता म्हणजेच भोगवटा वर्ग २ ची जागा वर्ग १ करुन विना परवानगी न घेता सदर ची जागा गट नं.१ ही तिऱ्हाईत इस्मास विक्री केल्याचे निदर्शनास कागदपत्रांवरून दिसते आजही सरकारी गट नंबर विक्री करताना जिल्हाधिकारी यांच्या शिवाय कोणत्याही शासकीय अधिकारी त्यास विक्रीबाबत परवानगी देता येत नाही व त्यास समशान भूमी साठी नोंद असतानादेखील व प्रत्यक्ष समशानभूमी साठी वापर आहे.

सदर समशान भूमी मध्ये आमचे पूर्वज व वडिलोपार्जित यांचे थडगे आज रोजी अस्तित्वात आहे खरेदी घेणाऱ्या समाजकंटकांकडून दहशतीने बेकायदेशीरपणे ताबा घेऊन वरील आमच्या वडिलोपार्जित कबरेच्या थडग्याच्या निशाण्या नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे व समस्त ग्रामस्थ यांनी विरोध करून तो हाणून पडलेला आहेत त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन धार्मिक भावना दुखून जातीय दंगल होण्याची शक्यता असल्यामुळे गावांमध्ये शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे 

तरी मागासवर्गीय ग्रामपंचायतच्या वतीने मौजे देडगाव तालुका नेवासा येथील गट नंबर १ हा मागासवर्गीय समशान भूमी साठी महसूल दप्तरी नोंद असताना देखील बेकायदेशीर बोगस अनधिकृतपणे सरकारी जमीन विकण्यास परवानगी नसतानाही विक्री करून दादागिरीने आमच्या पूर्वजांचे थडग्याचे व कंबरेचे नुकसान करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला व जातीय दंगल घडवून आणण्याचा व गावात शांतता भंग होईल असे कृत्य केलेले आहे 

म्हणून संबंधित सरकारी जमीन घेणारे तिऱ्हाईत इसम यांच्यावर ताबडतोब धार्मिक भावना दुखावणे व समशानभूमी ची जमीन स्वतःच्या फायद्यासाठी खरेदी केली व आमच्या वडिलोपार्जित कबरीचे व जागेचे नुकसान केले म्हणून वरील सर्व घटनेची चौकशी करून ताबडतोब संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करताना रिपब्लिकन पक्षाचे नेते अशोक गायकवाड समवेत प्रशांत हिवाळे, नितीन हिवाळे, कांतीलाल हिवाळे, प्रशांत हिवाळे, रॉबिन हिवाळे, संजय हिवाळे, सचिन हिवाळे, रवींद्र हिवाळे, योसेफ हिवाळे, श्रीकांत हिवाळे, ताराचंद हिवाळे, बाबुराव हिवाळे, शरद हिवाळे, संदीप हिवाळे आदीसह समस्त मागासवर्गीय ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS