Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षणक्षेत्रात भविष्यवेधी प्रयोग व्हायला हवे राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे मत

सातारा/प्रतिनिधी ः आज ज्या नोकर्‍या आपणाला चांगल्या वाटतात त्या कालबाह्य होऊन नवीनच पद्धतीच्या नोकर्‍या व कौशल्य भविष्यात आपणाला लागणार आहे. यासा

सप्टेंबर महिन्यापासून मिळू शकते लहान मुलांना लस ?
गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पुणे पॅटर्न उपयुक्त
पञकार रोहिदास दातिर खुनाच्या गुन्ह्यातील कान्हू मोरे यास राहुरीत अटक

सातारा/प्रतिनिधी ः आज ज्या नोकर्‍या आपणाला चांगल्या वाटतात त्या कालबाह्य होऊन नवीनच पद्धतीच्या नोकर्‍या व कौशल्य भविष्यात आपणाला लागणार आहे. यासाठी आपणाला अद्ययावत राहावे लागेल. त्यासाठी भविष्यवेधी  प्रयोग शैक्षणिक क्षेत्रामध्ये करावे लागतील. असे मत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी व्यक्त केले, ते रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कर्मवीर जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी होते. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे व संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेत येण्याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. कारण आज जरी मी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणायुक्त पदी असलो तरी माझ्या प्रशासन सेवेच्या प्रारंभाला रयत शिक्षण संस्थेचा परिसस्पर्श झालेला आहे. समाज सुधारणा करणारा समाजसुधारक हा जनतेच्या जीवनावर खरोखर प्रभाव टाकत असतो अशा प्रकारचे एक प्रभावी समाजसुधारक म्हणजे कर्मवीर अण्णा. स्वातंत्र्यपूर्व काळांमधील समाज म्हणजे एक विषमगटाची साखळी होती यातील काही कड्या मजबूत तर काही कमजोर होत्या. अशा कमजोर कड्यांमध्ये ताकद आणण्यासाठी अज्ञान, परंपरा व काही रूढी यांच्या विरोधात शिक्षण देऊन जनतेला सक्षम करावयाचे होते आणि हे कार्य अण्णांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केले. देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बर्‍याचश्या जनतेला स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थच माहीत नव्हता. स्वातंत्र्यानंतर आपण अतिशय मजबूत व्हावे यासाठी शिक्षणावर कार्य होणे गरजेचे होते आणि हे कार्य रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यात उभे केले.
      सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. ते म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोंबर 1919 रोजी संस्थेची स्थापना बहुजन समाजाचा विकास हा शिक्षणाशिवाय होऊ शकणार नाही हे ओळखून केली. त्यामुळे आज महाराष्ट्र देशामध्ये शिक्षणक्षेत्रात अग्रेसर दिसतो याचे श्रेय निश्‍चितच कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला आहे. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक महात्मा गांधी, महाराजा सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, सद्गुरू गाडगे महाराज,  वि.रा. शिंदे यांनी केले. अण्णांच्या कार्यात त्यांच्या पत्नी रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई पाटील यांनीही साथ दिली. रयत शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण संस्था नसून संस्कारपीठ आहे. समाजाच्या गरजा ओळखून संस्थेने आपल्या धोरणात बदल केले आहेत म्हणून संस्था राष्ट्रीय विकासात सुद्धा मोलाची भूमिका बजावत आहे. उपस्थित मान्यवरांचे आभार संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के  यांनी मानले. कर्मवीर कुटुंबीय, सहसचिव मा.बी.एन.पवार, ऑडिटर प्रि.डॉ.शिवलिंग मेनकुदळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  मा.रामचंद्र कोरडे, शिक्षणाधिकारी मा.प्रभावती कोळेकर, मा.शबनम मुजावर, सुभाष शिंदे, रवींद्र खंदारे, संदेश जाधव तसेच संस्थेचे कायदा सल्लागार दिलावर मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS