पर्यटनाच्‍या दृष्टिने पिंपळगाव माळवी तलाव परिसराचा विकास करणार. – मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यटनाच्‍या दृष्टिने पिंपळगाव माळवी तलाव परिसराचा विकास करणार. – मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर प्रतिनिधीमहानगरपालिकेच्‍या मालकीची 700 एकर जागा असलेल्‍या पिंपळगांव माळवी तलाव येथील पाण्‍याचे जलपुजन मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांच्

भंडारदरा धरण काल रविवारी सकाळी ओव्हरफ्लो.
ना. थोरात यांच्या पाठपुराव्यातुन तालुक्यात 5 मेगाहोल्ट पावर ट्रांसफार्मर मंजूर
पत्नीला चक्क पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना| LOK News24

अहमदनगर प्रतिनिधी
महानगरपालिकेच्‍या मालकीची 700 एकर जागा असलेल्‍या पिंपळगांव माळवी तलाव येथील पाण्‍याचे जलपुजन मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आली.

यावेळी माजी शहर प्रमुख मा.श्री.संभाजी कदम, माजी उपमहापौर मा.श्री.अनिल बोरूडे, मा.श्री.संजय शेंडगे, नगरसेवक मा.श्री.गणेश कवडे, मा.श्री.सचिन शिंदे, मा.श्री.शाम नळकांडे, मा.श्री.संतोष गेणाप्‍पा, पिंपळगांव माळवीचे सरपंच मा.सौ.राधिका प्रभुणे, उपसरपंच मा.सौ.भारती बनकर, उदयोजक मा.श्री.सुभाष झिने, सोसायटीचे चेअरमन मा.श्री.शशिकांत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्‍य मा.श्री.बापू बेरड, श्री.सतिष बनकर, श्री;संजय प्रभुणे, श्री.किशोर कानडे, श्री.श्रेयश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी सांगितले की, अहमदनगर महानगरपालिकेच्‍या पिंपळगांव माळवी तलाव पावसाच्‍या पाण्‍याने भरलेला असून नगर शहरापासून अगदी जवळच हा परिसर आहे. निसर्ग संपन्‍न वातावरण यामुळे या परिसरात नागरिक सुट्टीच्‍या दिवशी फिरण्‍यासाठी येतात. नागरिकांना तलाव परिसरात बसण्‍यासाठी चांगले बाकडे बसविण्‍यात येतील. काही ठिकाणी विद्युत व्‍यवस्‍था देखील करण्‍याचे प्रशासनाला सां‍गण्‍यात आले आहे.

तलाव भरल्‍यानंतर सांडेवरून वाहणारे पाणी दगडी फरशीवर वाहून खाली जाते जास्‍त पाऊस झाल्‍यावर रस्‍त्‍याचा अंदाज येत नाही. त्‍यामुळे अपघात होतात; त्‍यासाठी रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला रिलींग बसविण्‍यात येईल. नगर शहराचा वाढता विस्‍तार पाहता नागरिकांना मनोरंजनासाठी मनपाच्‍या उत्‍पन्‍नाच्‍या दृष्टिने बोटींग सुरू करणार.

त्‍यासाठी वेगवेगळया एजन्‍सी नियुक्‍त करण्‍यासाठी लवकरच निविदा काढण्‍यात येतील. तलावाच्‍या चारही बाजूने लोखंडी माहिती फलक बोर्ड बसविणे बाबत सांगितले. त्‍यामुळे पर्यटनासाठी आलेल्‍या नागरिकांना तलाव परिसराची माहिती मिळेल.

यावेळी सरपंच मा.सौ.राधिका प्रभुणे यांनी सांगितले की, त्‍या ठिकाणी असलेला वॉल ला गळती असून त्‍यामुळे पाणी वाया जाते. तलाव परिसरातील आजू बाजूला असलेली झाडे झुडपे काढणे बाबत सांगितले. याबाबत मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी जलअभियंता यांना वॉल दुरूस्‍ती करण्‍याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS