चक्क आई-वडिलांनीच केला दोन अल्पवयीन मुलींचा त्याग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्क आई-वडिलांनीच केला दोन अल्पवयीन मुलींचा त्याग

अहमदनगर/प्रतिनिधी : सुमारे पाच वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींचा त्याग करणार्‍या आई-वडिलांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्या

जनसामान्यांचा विकास हेच माझे ध्येय ः आमदार मोनिकाताई राजळे
ओबीसी आरक्षण जाण्याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार ; नगरच्या चक्का जाम आंदोलनात आरोप
‘यशस्वीतेचा सुवर्णमंत्र’ या पुस्तकातून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी :- अभिनेते राहुल सोलापूरकर

अहमदनगर/प्रतिनिधी : सुमारे पाच वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींचा त्याग करणार्‍या आई-वडिलांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस संबंधित अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांसह अनोळखी व्यक्तीचा शोध घेत आहेत. 3 डिसेंबर 2016 रोजी कोणीतरी दाम्पत्याने एका अनोळखी व्यक्तीच्या मदतीने त्यांच्या विद्या व किरण नावाच्या दोन अल्पवयीन मुलींना सांभाळ न करण्याच्या उद्देशाने उघड्यावर टाकून दिले. या दोन्ही मुलींना बाल संस्थेने आश्रय दिल्यानंतर त्यांच्या पालकांचा शोध घेतला, परंतु ते मिळून आले नाही. याप्रकरणी बालनिरीक्षण गृहाच्या अधीक्षक पौर्णिमा संजीव माने (वय 53, राहणार गुलमोहर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 317 अन्वये गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस हवालदार दीपक बोरुडे करीत आहे. या तिघांबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे (फोन नंबर 0241-2416117) येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

COMMENTS