Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परमबीर सिंह यांच्या असहकार्याचा एटीएसला अनुभव ; सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकारघंटा; तपासात अडथळे

मनसुख हिरेन हत्याकांडात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेचा साथीदार विनायक शिंदे याच्या घरातून एनआयएला एक डायरी सापडली आहे, या डायरीच्या आधारे हिरेन हत्येचा उलगडा होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे एटीएसनेही मुंबई पोलिस मुख्यालयातील सीसीटीव्ही तपास केल्यास हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती.

सर्वोदय विद्यालयाचे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धांत नेत्रदीपक यश
पासपोर्ट प्रकरणांचा निपटारा देणार पोलिसांना आर्थिक लाभ
पोतलेत स्वयंभू मारूती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

मुंबई / प्रतिनिधीः  मनसुख हिरेन हत्याकांडात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेचा साथीदार विनायक शिंदे याच्या घरातून एनआयएला एक डायरी सापडली आहे, या डायरीच्या आधारे हिरेन हत्येचा उलगडा होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे एटीएसनेही मुंबई पोलिस मुख्यालयातील सीसीटीव्ही तपास केल्यास हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. यातील रहस्य समोर येऊ शकतात असे म्हटले आहे. 

एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरेन हत्येचा खुलासा यापूर्वीच झाला असता, जर मुंबई पोलिसांनी योग्य सहकार्य केले असते. महाराष्ट्र एटीएसमधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की हे प्रकरण याआधीच उलगडले असते; परंतु मुंबई पोलिस मुख्यालयाकडून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची परवानगी दिली नाही. त्यासाठी आम्ही तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना चार पत्रेही पाठवली होती; परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले. एटीएसने अँटिलिया बंगल्याबाहेरील स्फोटकांचा तपास करताना २५ फेब्रुवारीच्या ४५ दिवस अगोदरचे आणि घटनेच्या नंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी मागितले होते, अँटिलिया बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली जी स्कोर्पिओ गाडी सापडली होती, ती १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान मुंबई पोलिस मुख्यालयात आणली होती, अशी माहिती एटीएसला मिळाली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर याचा खुलासा होण्याची शक्यता होती; परंतु सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश एटीएसला मिळाले नाहीत. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, विनायक शिंदे याच्या घरी जी डायरी सापडली, त्यात वसुलीबाबत माहिती आहे, यात ३० पब आणि बारचे नाव, पत्ता आणि त्यांच्याकडून येणारी रक्कम किती याचा उल्लेख आहे, वाझे याने ही जबाबदारी शिंदेला सोपवली होती. याशिवाय काही पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यवसायाचे नाव आणि पत्ते आहेत. मुंबई पोलिसांनी जोडलेल्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये वसूल करून वाझेंकडे पोहचवायचे होते, पोलिस ज्या वेळी कोणत्याही बियर बार, अवैध व्यवसायावर छापा टाकत होते, तेव्हा वाझेचा फोन यायचा आणि अटक केलेल्यांना सोडायला सांगितले जायचे. वाझेकडे अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांकडून लाखो रुपये सुरक्षित अनामत रक्कम घेण्याचा नियम जगजाहीर होता; यात क्रिकेट बुकीपासून अनेक व्यवसायांचा समावेश होता.

महिन्याला २८ कोटींची वसुली

मुंबईत जवळपास १४०० बियरबार आणि अवैध धंदे आहेत, ज्यांच्याकडून महिन्याला दोन लाख रुपये कमाई म्हणून महिन्याला २८ कोटी रुपये वसूल होत होते, ही रक्कम पीआय पातळीपासून आयुक्तस्तरापर्यंत पोहचवली जात होती, असे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी दावा केला. तसेच हे मुंबईत फार पूर्वीपासून सुरू आहे, कोणताही नवा नियम झाल्यानंतर पोलिसांची कमाई वाढत होती, हे सगळे पोलिस संरक्षणात होत असे, वसुलीचे प्रकार कधीही लपले नाहीत.

COMMENTS