जिल्हा बँकेचे लेखा परीक्षण करणार खासगी लेखा परीक्षक ; 26 लेखा परीक्षकांची नेमणूक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा बँकेचे लेखा परीक्षण करणार खासगी लेखा परीक्षक ; 26 लेखा परीक्षकांची नेमणूक

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्हा सहकारी बँकेची व्याप्ती आणि पसारा मोठा आहे. यामुळे गुणवत्ता आणि वेळेत बँकेची दैनंदिन कामे व्हावीत, यासाठी जिल्हा बँकेने शाखा

बंदी उठवल्याने नगरमध्ये बैलगाडाप्रेमींचा जल्लोष
सोमवारी जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन
नगर शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट…

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्हा सहकारी बँकेची व्याप्ती आणि पसारा मोठा आहे. यामुळे गुणवत्ता आणि वेळेत बँकेची दैनंदिन कामे व्हावीत, यासाठी जिल्हा बँकेने शाखानिहाय वर्गीकरण करून त्यांचे लेखा परीक्षण नेमून दिलेल्या खासगी लेखा परीक्षकांकडून करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या अंतर्गत लेखा परीक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला उपाध्यक्ष माधवराव कानवडे, ज्येष्ठ संचालक भानुदास मुरकुटे, संचालक करण ससाणे आणि प्रशांत गायकवाड उपस्थित होते. बँकेच्या संचालक मंडळाने यापूर्वीच लेखा परीक्षणाच्या विषयावर अध्यक्ष व उपाध्यक्षांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यात ज्येष्ठ संचालक मुरकूटे स्वत: सीए असल्याने त्यांनी या बैठकीत सूचना केल्या.
यापूर्वी बँकेच्या शाखांचे लेखा परीक्षण हे बँकेचे कर्मचारी करत होते. मात्र, बँकेची व्याप्ती आणि पसारा मोठा असल्याने त्यात अडचणी येत येत होत्या. तसेच गुणवत्तेचा विषय असल्याने बँकेने नियुक्त केलेल्या लेखा परीक्षकांच्या मार्फत बँकेच्या कामकाजाचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बँकेने 26 खासगी लेखापरीक्षक यांची नेमणूक केलेली असून या सर्वांना बँकेत बोलावून त्यांना बँकेच्या शाखेच्या व्याप्तीनुसार शाखा वाटून दिल्या आहेत. त्यासाठी बँकेच्या शाखेच्या वर्गवारीनुसार संबंधित लेखापरीक्षक यांना मोबदला देण्यात येणार आहे. या बँकेच्या कामकाजाच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होणार असल्याचा विश्‍वास अध्यक्ष शेळके यांनी व्यक्त केला.

COMMENTS