Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये  छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे मोठे योगदान – -पी-व्ही बनसोडे

बीड प्रतिनिधी - महामानव अभिवादन ग्रुप व महामानव  सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने   मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये   छत्रपती राजर्षी शाहू

दौंडमध्ये तरुणांचे बळजबरी धर्मांतर ः आमदार नीतेश राणेंचा आरोप
उरण मध्ये पाच वर्षीय मुलीवर बलात्कार
कोतवाली पोलिस ठाण्यातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव

बीड प्रतिनिधी – महामानव अभिवादन ग्रुप व महामानव  सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने   मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये   छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 149 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही बनसोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी शिक्षणाधिकारी  एस.एन उजगरे,यु.एस वाघमारे, अमरसिंह ढाका होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.व्ही बनसोडे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या मनोगता मध्ये म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे योगदान हे अनन्यसाधारण आहे. परंतु सध्याच्या महाराष्ट्रा समोर पुरोगामीत्व टिकवण्यामध्ये मोठे आव्हाने उभे राहत आहेत.त्यामुळे  महाराष्ट्र राज्यास पुरोगामी राज्य म्हणावे  की कसे अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत.शिक्षण घेत असताना छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य आत्मसात करून त्यांच्या सामाजिक कार्याचा आमच्या जीवनामध्ये अंगीकार करावा जेणेकरून सक्षम पिढी निर्माण होईल यात शंका नाही. यावेळी नवोदय पात्र विद्यार्थी आयु.आयुष्य शेवाळे याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय एस.एन उजगरे,यु.एस वाघमारे, अमरसिंह ढाका यांनीही छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कॅप्टन आठवले प्रा. अशोक गायकवाड प्रा.जवंजाळ, प्रा.शिरसाट, वैजनाथ पायके, रघुनाथ शेवाळे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. जी एम भोले महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम राऊत यांनी केले व आभार प्रदर्शन बी. डी तांगडे यांनी मानले. या कार्यक्रमास आयु.आयुष्य शेवाळे यांनी आपण छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून शिक्षणामध्ये पुढे जाऊ असे मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमास आयु. सवई, शंकर वावळकर, नामदेव काळे, विद्यागर नाना, इ.मान्यवर उपस्थित होते, शेवटी सरनातय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. महामानव अभिवादन ग्रुप व महामानव  सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने  दि 26/06/ 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये   छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 149 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही बनसोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी शिक्षणाधिकारी  एस.एन उजगरे,यु.एस वाघमारे, अमरसिंह ढाका होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.व्ही बनसोडे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या मनोगता मध्ये म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे योगदान हे अनन्यसाधारण आहे. परंतु सध्याच्या महाराष्ट्रा समोर पुरोगामीत्व टिकवण्यामध्ये मोठे आव्हाने उभे राहत आहेत.त्यामुळे  महाराष्ट्र राज्यास पुरोगामी राज्य म्हणावे  की कसे अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत.शिक्षण घेत असताना छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य आत्मसात करून त्यांच्या सामाजिक कार्याचा आमच्या जीवनामध्ये अंगीकार करावा जेणेकरून सक्षम पिढी निर्माण होईल यात शंका नाही. यावेळी नवोदय पात्र विद्यार्थी आयु.आयुष्य शेवाळे याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय एस.एन उजगरे,यु.एस वाघमारे, अमरसिंह ढाका यांनीही छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कॅप्टन आठवले प्रा. अशोक गायकवाड प्रा.जवंजाळ, प्रा.शिरसाट, वैजनाथ पायके, रघुनाथ शेवाळे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. जी एम भोले महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम राऊत यांनी केले व आभार प्रदर्शन बी. डी तांगडे यांनी मानले. या कार्यक्रमास आयु.आयुष्य शेवाळे यांनी आपण छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून शिक्षणामध्ये पुढे जाऊ असे मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमास आयु. सवई, शंकर वावळकर, नामदेव काळे, विद्यागर नाना, इ.मान्यवर उपस्थित होते, शेवटी सरनातय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS