Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या गाड्यांना पुन्हा फासले काळे !

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न काही केल्या शांत होण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या ट्रकवर बेळगावमध्ये

खाद्य तेलाची आयात 40 टक्क्यांनी कमी करणार- तोमर
राजधानीत धुक्याचा रेड अलर्ट
 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये जितेंद्र जोशी लावणार हास्याचा चौकार

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न काही केल्या शांत होण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या ट्रकवर बेळगावमध्ये कानडी संघटनांनी दगडफेक केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर बोम्मई यांना महाराष्ट्राच्या गाडयांना संरक्षण देऊ अशी भूमिका घेऊन काही तास उलटत नाही तोच, गुरुवारी पुन्हा महाराष्ट्राच्या गाडयांना काळे फासण्याचा प्रकार समोर आला आहे.


 सीमाप्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी केली आहे. तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमप्रश्‍न हाताळता येत नसेल तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकून केली जात आहे. राज्यात सीमावाादाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच कर्नाटकमधील काही संघटनांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वाहनांना काळे फासले आहे. कर्नाटकचे समर्थन करणार्‍या काही संघटनांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वाहनांना अडवले आहे. त्यांनी कर्नाटकमधील गडाग जिल्ह्यात महाराष्ट्राच्या वाहनांना काळे फासले आहे. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी तर वाहनांवर चढून आंदोलन केले आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.


दरम्यान, कर्नाटकच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमेवरील परिस्थिती निवळली नाही, तर मला तेथे जावे लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. तर शरद पवार फक्त बोलत नाहीत, तर ते करून दाखवतात. शरद पवार सीमेवर गेले तर तेथे अख्खा महाराष्ट्र असेल, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. हे सकार नामर्द आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

COMMENTS