औंध जिल्हा परिषद गटातील विकासकामासाठी 5 कोटीचा निधी मंजूर : गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची माहिती

Homeमहाराष्ट्रसातारा

औंध जिल्हा परिषद गटातील विकासकामासाठी 5 कोटीचा निधी मंजूर : गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची माहिती

औंध जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामासाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या माध्यमातून लेखाशिर्ष 25-15 मधून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.

धनजंय जाधव शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी
आजचे राशीचक्र बुधवार,१२ जानेवारी २०२२ अवश्य पहा | LokNews24
कलावंत प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी संजय शिंदे

औंध / वार्ताहर : औंध जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामासाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या माध्यमातून लेखाशिर्ष 25-15 मधून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.

गायत्रीदेवी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औंध जिल्हा परिषद गटातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी गावअंतर्गत विकासकामासाठी निधी देण्याची मागणी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता. गावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विकासकामासाठी 25-15 लेखाशिर्ष मधून पाच कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद गटातील कामाची यादी आणि मंजूर झालेला निधी पुढीलप्रमाणे -नांदोशी गावांतर्गत रस्ते आणि गटार बांधणे 20 लक्ष, उंबर्डे ते कुमठे भाग ग्रामपंचायत ते वडूज-कराड रस्ता तयार करणे 10 लक्ष, वरुड ते साळुंखे वस्ती रस्ता तयार करणे 10 लक्ष, सिध्देश्‍वर कुरोली ते धकटवाडी रस्ता तयार करणे 15 लक्ष, भुरकवडी ते धकटवाडी रस्ता तयार करणे 20 लक्ष, सिध्देश्‍वर कुरोली येथील रानमळा फाटा ते बनसोडे वस्ती रस्ता तयार करणे 10 लक्ष, उंबर्डे ते बाळूबाई मंदीराकडे जाणारा रस्ता तयार करणे 20 लक्ष, उंबर्डे येथे ग्रामसचिवालय बांधणे 20 लक्ष, जायगांव गावअंतर्गत रस्ते आणि गटर बांधणे 30 लक्ष, गोसाव्याचीवाडी गाव अंतर्गत रस्ते आणि गटर बांधणे 10 लक्ष, अंबवडे गावांतर्गत रस्ते आणि गटर बांधणे 15 लक्ष, गोपूज गावांतर्गत रस्ते आणि गटर बांधणे 10 लक्ष, नायकाचीवाडी गावांतर्गत रस्ते आणि गटर बांधणे 10 लक्ष, सिध्देश्‍वर कुरोली येथील ग्रामपंचायत मिळकत नंबर 255 मधील बहुउद्देशीय सभागृहाची सुधारणा आणि सुशोभीकरण करणे 15 लक्ष, लोणी ते धकटवाडी रस्ता तयार करणे 10 लक्ष, नढवळ गावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष, भोसरे गावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष, खबालवाडी गावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष, वरुड गावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष, गुरसाळे गावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष, लोणीगावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष, औंध येथील मूळपीठ देवीकडे जाणारा रस्ता तयार करणे 42 लाख रुपये, औंध गावांतर्गत रस्ते करणे 90 लक्ष, औंध गावांतर्गत आरसीसी गटर बांधणे 45 लक्ष, औंध येथील जुने एसटी स्टँड येथील व्यापारी संकुल दुरुस्ती करणे 38 लक्ष रुपये. वरील प्रमाणे मंजूर विकासकामे स्थानिक पातळीवर ग्रामस्थांना बरोबर घेऊन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. काही गावांना आता विकासकामासासाठी निधी उपलब्ध झाला नसला तरी पुढील टप्प्यात त्या गावासाठी प्राधान्याने निधी देण्यात येईल. औंध जिल्हा परिषद गटातील गावांच्या अडीअडचणी आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबध्द असल्याची ग्वाही गायत्रीदेवी यांनी दिली.

COMMENTS