… अखेर रणजितसिंह देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे वडूज येथे जंबो कोविड सेंटर उभारणीस वेग

Homeमहाराष्ट्रसातारा

… अखेर रणजितसिंह देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे वडूज येथे जंबो कोविड सेंटर उभारणीस वेग

कोरोनाच्या काळात खटाव-माण तालुक्यातील रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी व तालुक्यात त्वरित जंम्बो कोविड सेंटर होण्यासाठी हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेस पक्षातील मंत्री महोदयांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना खटाव तालुक्याच्या दौर्‍यावर प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा दिला.

राज्यपाल येता घरा…कोश्यारींच्या आजच्या दौर्‍यानिमित्त हिवरे बाजारमध्ये साफसफाई
Beed : नवरात्री स्पेशल : धारूरची नवसाला पावणारी अंबाचंण्डी माता… (Video)
अट्टल चोरट्यांनी थेट फॉर्च्युनर गाडीच नेली चोरून, मग पुढे… | LOK News 24


औंध / प्रतिनिधी : कोरोनाच्या काळात खटाव-माण तालुक्यातील रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी व तालुक्यात त्वरित जंम्बो कोविड सेंटर होण्यासाठी हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेस पक्षातील मंत्री महोदयांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना खटाव तालुक्याच्या दौर्‍यावर प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा दिला. त्या पाठपुराव्याला यश मिळाले वडूज येथे जंबो कोविड सेंटर उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

खटाव-माण तालुक्यात कोरोनाच्या लाटेत अनेकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. अपुर्‍या सोयीसुविधामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे रणजितसिंह देशमुख यांनी अत्यंत तळमळीने मंत्रालय स्तरावर अनेक हेलपाटे मारून ’माझ्या जनतेला वाचवा’ अशी आर्त हाक ना. बाळासाहेब थोरात, ना. अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. त्यांनीही तातडीने प्रतिसाद देत खास बाब म्हणून खटाव-माणसाठी तातडीने जंम्बो कोविड करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी रणजितसिंह देशमुख यांना सांगितले.

वडूज येथे प्रशासकीय अधिकार्‍यांनी जंबो कोविड सेंटरसाठी जागेची पाहणी केली. लागणार्‍या सोयीसुविधासाठीचे पत्रव्यवहारही सुरू झाले आहेत. 100बेडचे अद्ययावत कोविड सेंटर येत्या 28 दिवसात उभे राहण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हलचाली सुरू झाल्या आहेत. खटाव तालुक्यातील केंद्रबिंदू असणार्‍या ग्रामीण रुग्णालय वडुज या ठिकाणी शासनाच्या काही एजन्सीमार्फत कोविड सेंटर उभारले जाईल. त्यामुळे जनतेची ससेहोलपट थांबणार आहे. 

खटाव-माण तालुक्यातील जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक, ससेहोलपट थांबविण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. जनतेच्या कोणत्याही प्रश्‍नांसाठी मी जीवाचे रान करण्यासाठी मागे-पुढे पाहत नाही. सर्वसामान्य दुष्काळी भागातील जनतेला न्याय देण्यासाठी मी कटिबध्द आहे. जिल्हाधिकार्‍यांनी वरिष्ठ मंत्री महोदय व जिल्हा प्रशासन तसेच राज्य प्रशासन यांच्याशी संपर्क साधून ग्रामीण रुग्णालय वडूज याठिकाणी जंम्बो कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. लवकरच याला यश प्राप्त होईल म्हणून मी तालुक्यातील जनतेच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो.

रणजितसिंह देशमुख (काँग्रेस नेते)

COMMENTS