इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशीप सोसायटीने केला डॉ. गायकवाड यांचा गौरव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशीप सोसायटीने केला डॉ. गायकवाड यांचा गौरव

दिल्ली/विशेष प्रतिनिधी : लातूर मतदार संघाचे लोकसभेचे माजी खासदार प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना शुक्रवारी इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशीप सोसायटीचा अ

जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
भारतात कोरोना लसीकरण मोहिमेने ओलांडला 63 कोटींचा टप्पा
दहावीत कमी गुण पडतील या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या | LOK News 24

दिल्ली/विशेष प्रतिनिधी : लातूर मतदार संघाचे लोकसभेचे माजी खासदार प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना शुक्रवारी इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशीप सोसायटीचा अत्यंत मानाचा पुरस्कार भारत ज्योती अ‍ॅवॉर्ड देऊन तमिळनाडूच्या राज्यसभा खासदार डॉ. शशिकलापुष्पा रामास्वामी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशीप सोसायटी (दिल्ली) या संस्थेद्वारे आजपर्यंत देशातील अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. इकॉनॉमिक ग्रोथ अँड नॅशनल इंटिग्रेशन या विषयावर शुक्रवारी दिल्ली येथे सेमिनार घेण्यात आला. देशाच्या जवळपास सगळ्या राज्यातून प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने असामान्य असे कार्य करणार्‍या काही निवडक महिला आणि पुरुष यांना दरवर्षी भारत ज्योति अवॉर्ड दिला गेला. यापूर्वी हा राष्ट्रीय प्रतिष्ठित अ‍ॅवॉर्ड प्रसिद्ध समाजसेविका मदर तेरेसा,पूर्व उप राष्ट्रपती बी.डी.जत्ती,राज्यपाल गुरुमित सिंह, उत्तराखंडचे राज्यपाल वाजुभाई वाला, पूर्व राज्यपाल इक्बाल सिंह, पूर्व राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, पूर्व निवडणूक आयुक्त जीवीजी कृष्णमूर्ती, पूर्व मुख्यमंत्री हिमाचल प्रदेश प्रेमकुमार धुमल, पूर्व शिक्षा मंत्री भारत सरकार डॉ. रमेश पोखरियाल निषाद, प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ बी. के. गोयल, प्रसिद्ध अभिनेते तथा माजी केंद्रीयमंत्री सुनील दत्त, अभिनेता देव आनंद, अभिनेता प्राण, अभिनेता शम्मी कपूर, अभिनेता राजेंद्र कुमार, अभिनेता राजेश खन्ना, प्रसिद्ध गायक एस.पी.बालसुब्रमनियम, उस्ताद अमजद अली खान, क्रिकेटर चेतन चौहान, क्रिकेटर सुनील गावसकर, क्रिकेटर सईद किरमनी, ऑलिंपिक विजेता अभिनव बिंद्रा, धनराज पिल्ले अशा समाजातील विविध मान्यवरांचा भारत ज्योती अ‍ॅवॉर्डने गौरव करण्यात आला आहे.
असा प्रतिष्ठित भारत ज्योती गौरव अ‍ॅवॉर्ड 2021 लोकसभेचे माजी खासदार प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना देऊन दिल्ली येथील भव्य अशा कार्यक्रमात इंडिया इंटनॅशनल सेंटर, मल्टी पर्पज हॉल, न्यू बिल्डिंग लोधी गार्डन, न्यू दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह आणि प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला. इंडिया इंटनॅशनल फ्रेंडशीप सोसायटी, दिल्लीचे महासचिव गुरुप्रित सिंह यांनी खास आग्रह करून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना विनंती केली होती. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी 16 व्या लोकसभेत उत्कृष्टरित्या काम करून आपला ठसा संसदेत उमटवला आहे. त्यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानीत केले आहे. नुकताच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसने 16 व्या लोकसभेतील उच्च शिक्षित खासदार म्हणून नोंद करून त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. लातूरमध्ये खासदार असताना अनेक समाज उपयोगी कामे केली. प्रामुख्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पासपोर्ट सेवा केंद्र, नीट परीक्षा केंद्र, रेल्वे बोगी कारखाना, रेल्वे स्टेशन लातूर रोड, रेल्वे स्टेशन उदगीरला दादराचे काम पूर्ण करून उदगीरला नवीन प्लॉट फॉर्म आणि लातूर रोड, लातूरला प्लॅटफॉर्म आणि जवळपास 21 नवीन ट्रेन सुरु केल्या. लातूर जिल्ह्यात नॅशनल हायवेचे काम करून घेतले. अशी अनेक कामे खासदार असताना केल्याची दखल घेऊन डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे. त्यात प्रामुख्याने लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल पीस अ‍ॅवॉर्ड- बांगला देश, लॉर्ड बुद्धा पिस अवॉर्ड- भारत म्यानमार दिल्ली, समाज सेवी सन्मान- राज भवन मुंबई, राष्ट्रीय समाज सेवा रत्न- मध्य प्रदेश, छत्रपती शिवाजी महाराज गौरव अ‍ॅवॉर्ड- मुंबई, इंडियन स्टार्स अवॉर्ड- मुंबई, लोकमत आयकॉन ऑफ लातूर, डॉ. बी. आर. आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड- नेपाल- दिल्ली,संसद रत्न अ‍ॅवॉर्ड- दिल्ली, भारत रत्न डॉ.आंबेडकर अ‍ॅवॉर्ड- मुंबई, लॉर्ड बुद्धा नॅशनल अ‍ॅवॉर्ड- दिल्ली, भारत ज्योती राष्ट्रीय अ‍ॅवॉर्ड- दिल्ली, डॉ. शामा प्रसाद मुखर्जी अ‍ॅवॉर्ड -दिल्ली, भारत शौर्य अ‍ॅवॉर्ड -दिल्ली, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणेचा जीवन गौरव पुरस्कार-2021, भारतीय समाज रत्न दिल्ली, अनाथ पिंडक इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड- कर्नाटक, धम्म गौरव पुरस्कार- नासिक, दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतळगिरीकडून गौरव सन्मान, पत्रकारिताचे सतत तीन दर्पण पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांची दखल घेऊन भारत ज्योती अवॉर्ड 2021 हा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. कार्यक्रमाला तामिळनाडूच्या राज्यसभा खासदार डॉ. शशिकलापुष्पा रामास्वामी, काँग्रेसचे वरिष्ठ नेता मेजर वेद प्रकाश,पूर्व कुलगुरू तामिळनाडू डॉ.बी.रामास्वामी, हरियाणाचे माहिती आयुक्त लेफ्ट. जनरल के.जे.सिंह, कार्यक्रमाचे आयोजक गुरूप्रित सिंह आदी उपस्थित होते.त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्व मित्र परिवार आणि सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS