अहमदनगर : केडगावमध्ये ११ लाखांची सुगंधी सुपारी जप्त

Homeशहरंअहमदनगर

अहमदनगर : केडगावमध्ये ११ लाखांची सुगंधी सुपारी जप्त

प्रतिनिधी : अहमदनगर कोतवाली पोलिसांनी सुगंधी सुपारी बाळगणार्‍यावर आणखी एक कारवाई केली आहे. उपनगरीय भागातील केडगावमध्ये गुरुवारी सकाळी ही कारवाई कर

नगर-मनमाड रस्त्यावर प्रकटले यमराज व चित्रगुप्त
सडे येथे घरगुती वादातून मारहाण; एकाचा मृत्यू
खुनाच्या प्रयत्नाबद्दल एकास सक्तमजुरीची शिक्षा

प्रतिनिधी : अहमदनगर

कोतवाली पोलिसांनी सुगंधी सुपारी बाळगणार्‍यावर आणखी एक कारवाई केली आहे. उपनगरीय भागातील केडगावमध्ये गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. 

कोतवाली पोलिसांनी घरातून सुमारे सव्वा लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. 

अक्षय बापू राहिंज (वय 28, भूषणनगर, केडगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाहे. त्याच्याकडून सुगंधी सुपारी 25 किलो, 12 पोते तंबाखू, 30 किलो सुपारी तसेच मावा बनविण्याचे मशीन पोलिसांनी जप्त केले आहे. 

पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे, सागर पालवे, भारत इंगळे, सुजय हिवाळे, दीपक रोहोकले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

COMMENTS