Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 895 रुग्ण; उपचारादरम्यान 16 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 895 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

आता गॅस सिलेंडरवर मर्यादा ; वर्षभरात केवळ 15 गॅस सिलेंडर मिळणार
वाहतूक नियमांच्या उल्लंघनासंबंधी नऊ हजार प्रकरणे दाखल
कविता ही हृदयाची भाषा ती जगता आली पाहिजे ः कवी प्रकाश घोडके

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 895 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच उपचारादरम्यान 16 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधित रुग्णांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 42 (8309),  कराड 231 (25598), खंडाळा 38 (11461), खटाव 46 (18630), कोरेगांव 84 (16129), माण 37 (12654), महाबळेश्‍वर 3 (4209), पाटण 65 (7964), फलटण 68 (27831), सातारा 226 (38915), वाई 43 (12338) व इतर 12 (1232) असे आज अखेर एकूण 1 लाख 85 हजार 270 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 0 (185), कराड 6 (748), खंडाळा 1 (147), खटाव 4 (469), कोरेगांव 2 (371), माण 0(249), महाबळेश्‍वर 0 (44), पाटण 1 (185), फलटण 0 (276), सातारा 2 (1185), वाई 0 (323) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 4 हजार 182 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS