Homeताज्या बातम्या

पहिल्या पत्नीस फसवून केले चक्क आणखी दोन विवाह..

अहमदनगर/प्रतिनिधी-पत्नीला फसवून पतीने आणखी दोन लग्न करून तसेच घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करू

कृष्णा काळेंची नौसेनेत सबलेफ्टनंट पदावर निवड
अवजड वाहनाच्या धडकेने ट्रान्सफॉर्मर जळून खाक; राहुरीत तीन दिवस अंधार; गुन्हा नोंद न झाल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांचे सहकारक्षेत्रासाठी मोठे योगदान : रामदास भोसले

अहमदनगर/प्रतिनिधी-पत्नीला फसवून पतीने आणखी दोन लग्न करून तसेच घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून देण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे घडली. सविता विजय नागरे (वय 24 रा. निंभेरे ता. राहुरी) हिने राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
सविताचा विवाह विजय नागरे याच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस तिला व्यवस्थित नांदवले. त्यानंतर सविता हीस सासु-सासरे व पती यांनी आपल्याला गायांचा धंदा करायचा, तू तुझ्या आई-वडिलांकडून दोन लाख रुपये आण, अशी मागणी केली. सविता हिने माहेरहून दोन लाख रुपये आणून दिले. काही दिवसांनी परत गाडी घ्यायची म्हणून एक लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. एक लाख रुपये घेतल्यानंतर पुन्हा घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत म्हणून सविता हिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. दरम्यान, सविता हिला फसवून तिचा पती विजय याने शेवगाव येथील अलका तांदळे व त्यानंतर संगमनेर येथील अक्षदा घुगे या दोन तरुणींसोबत लग्न केले. या प्रकरणी तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विजय उर्फ गणेश विठ्ठल नागरे, सखुबाई नागरे (सासू), विठ्ठल नागरे,(सासरा) सोनल गणेश शेळके, गणेश शेळके, गणेश भाऊसाहेब सांगळे (सर्व राहणार निंभोरे ता.राहुरी.) या सहा जणांवर फसवणूक व पैशासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS