पोलिसांचा आणखी एक दणका…कर्जतच्या टोळीवरही मोक्का

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांचा आणखी एक दणका…कर्जतच्या टोळीवरही मोक्का

अहमदनगर/प्रतिनिधी- नगरच्या पोलिसांनी लागोपाठ दोन दिवस संघटित गुन्हेगारी करणारांना जोरदार दणके दिले आहेत. गुरुवारी नगरच्या बोल्हेगाव-गांधीनगर परिसराती

गुन्ह्यातील जप्त किमती मुद्देमाल ठेवणार बँक लॉकरमध्ये…; जिल्हा पोलिसांचा विचार सुरु, नियमावली केली जाणार
अहमदनगरच्या लक्सझरीं बस असो.च्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिलाताई पवार स्वागत
तक्रार अर्जांची आता पोलिस घेणार वेळेत दखल

अहमदनगर/प्रतिनिधी- नगरच्या पोलिसांनी लागोपाठ दोन दिवस संघटित गुन्हेगारी करणारांना जोरदार दणके दिले आहेत. गुरुवारी नगरच्या बोल्हेगाव-गांधीनगर परिसरातील टोळीला मोक्का कारवाईचा दणका दिल्यावर शुक्रवारी कर्जत तालुक्यातील संघटीत गुन्हे करणार्‍या टोळीतील पाचजणाविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा संदीप ईश्‍वर भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अ.नगर. टोळी प्रमुख) व त्याच्या टोळीने संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे या टोळीविरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी नगर पोलिसांनी प्रस्ताव नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने या टोळीतील टोळी प्रमुख व टोळीतील सदस्य यांच्यावर मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मीलन उर्फ मिलिंद ईश्‍वर भोसले (वय 19), संदीप ईश्‍वर भोसले, मटक्या उर्फ नारायण ईश्‍वर भोसले, जमाल उर्फ पल्या ईश्‍वर भोसले, अटल्या उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्‍वर भोसले (सर्व रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. नगर) या आरोपींवर मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीविरुध्द नगर तालुका पोलिस ठाणे व कर्जत पोलिस ठाण्यात प्रत्येकी चार, पारनेर पोलीस ठाण्यात दोन, पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन, एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यात एक, जामखेड पोलिस ठाण्यात एक असे गुन्हे दाखल आहेत. दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, दरोडयाची तयारी करणे, जबरी चोरी करणे, खुनासह दरोडा टाकणे, घातक शस्त्राचा वापर करुन दुखापत करुन दरोडा टाकणे अशा स्वरुपाचे हे गुन्हे असून, कट करुन व संगनमताने स्वतःच्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे हे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण विभाग करीत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मागच्या काही दिवसापूर्वी नगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी संघटीत गुन्हेगारी टोळयांविरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

COMMENTS