कुमार जगताप यांना जीवे मारण्याची धमकी ; कुळधरणमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Homeअहमदनगर

कुमार जगताप यांना जीवे मारण्याची धमकी ; कुळधरणमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटनेचे मुख्य संघटक कुमार जगताप यांना दमदाटी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त

सावेडीतील बहुचर्चित रस्ता अखेर गुंडाळला ; अर्धवट अवस्थेतील काम मनपाने केले रद्द, शासनाला पैसेही परत पाठवले
कोरोना काळात गरीबांसाठीच्या धान्याचे नगरला होत होते पीठ ; अटक केलेल्या आठ आरोपींना पोलिस कोठडी
अहिल्यानगर : महाकुंभसाठी भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराजांचे प्रयागराजकडे प्रस्थान

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटनेचे मुख्य संघटक कुमार जगताप यांना दमदाटी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे वन्यजीव विभागाच्या रेहेकुरी काळवीट अभयारण्य कार्यक्षेत्रातील कुळधरण भागातील जंगलात गुरे चारल्याची माहिती दिल्याचा संशय मनात धरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

या प्रकरणी बाळू हरीभाऊ सुपेकर, चांगदेव तुकाराम सुपेकर, भाऊ शहाजी सुपेकर यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुमार जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे, मी शनिवार, दि.९ ऑक्टोबर रोजी कुळधरण येथील जगदंबा देवीच्या मंदिरासमोर असताना बाळू सुपेकर, चांगदेव सुपेकर, भाऊसाहेब सुपेकर या तिघा आरोपींनी आम्ही फॉरेस्टमध्ये गुरे चारतो, या बातम्या फॉरेस्ट खात्याला देतो, 

याचा संशय मनात धरून मला शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस भाऊसाहेब यमगर करीत आहेत. आरोपींचा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हटले आहे.

COMMENTS