फडणवीस यांच्यावर बेछूट आरोपाचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील – चंद्रकांत पाटील

Homeताज्या बातम्या

फडणवीस यांच्यावर बेछूट आरोपाचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील – चंद्रकांत पाटील

पुणे: संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे लक्ष विचलित

Sangamner : संगमनेर शहरामध्ये ६० टक्के लसीकरण पूर्ण (Video)
कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
ज्येष्ठ काँग्रेस नेते किरण रेड्डींचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कोणाला तरी उभे केले जाते. त्याच पद्धतीने अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक बेछूट आरोप करत आहेत. पण भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादात ओढण्याचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव उपस्थित होते. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले आहे, असे पाटील यांनी निदर्शनाला आणले.

COMMENTS