Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

दहीवीच्या परीक्षेत अगस्ती विद्यालयाची चमकदार कामगिरी

अकोले : श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अकोले येथील मार्च 2026 मधील एसएससी परीक्षेचा निकाल 98.29

कर्जमाफी शासन आदेशाची अकोलेत होळी; किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलन
दहावीच्या परीक्षे गणोरे केंद्रात आर्यन विवेक आंबरे प्रथम
डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना ‘राष्ट्रीय कर्तव्य सन्मान’ पुरस्कार; अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते गौरव


अकोले : श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अकोले येथील मार्च 2026 मधील एसएससी परीक्षेचा निकाल 98.29 टक्के लागला असून विद्यालयाने गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. संस्थेत व विद्यालयात कु. दिव्या संतोष बगनर हिने प्रथम, यशराज गणेश ठोकळ याने द्वितीय, तर कु. श्रद्धा महेश पंडित हिने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यालयातील 235 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी तब्बल 231 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 40 विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले असून 88 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, तर 86 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. तालुकास्तरावर कु. दिव्या संतोष बगनर हिने द्वितीय, यशराज गणेश ठोकळ याने तृतीय, तर कु. श्रद्धा महेश पंडित हिने चतुर्थ क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी तथा बाबा यांनी स्थापनेपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले. स्वर्गीय बाबा व स्वर्गीय मातोश्री दुर्गाबाई नाईकवाडी यांनी संस्थेच्या उभारणीसाठी व प्रगतीसाठी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या प्रेरणेतून आजही संस्थेचे पदाधिकारी सातत्यपूर्ण गुणवत्तेसाठी प्रयत्नशील आहेत. विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे. विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये शंतनू शिवाजी हासे (95 टक्के), निखिल रामचंद्र मेंगाळ (94.40), साईराज विजय मंडलिक (93.60), मानसी मंगेश ढोकरे (92.60), तेजस्वी बाळू गोर्डे (92.20), प्रसाद तुकाराम नाडेकर (92.20), गायत्री विठ्ठल चव्हाण (91.80), संस्कृती गणेश फटांगरे (91.20), समिधा गणेश मंडलिक (90.40) व स्नेहल भरत भांगरे (90 टक्के) यांचा समावेश आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यालयांत अतिरिक्त तासिका, सातत्यपूर्ण सराव, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच वैयक्तिक लक्ष यांसारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. त्यातूनच निकालाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. या यशाबद्दल संस्थेच्या सचिव शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, शालेय व्यवस्थापन समितीचे सचिन शिंदे, गिरीष नवले, डॉ. निलेश सहाणे, प्रथमेश कुलकर्णी, प्रितम काळे, राहुल सोनवणे, उज्वला फुलसुंदर, पालकवर्ग तसेच प्राचार्य मंगेश खांबेकर, उपमुख्याध्यापक तात्यासाहेब दौंड, पर्यवेक्षक नंदा गोपाळे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.

COMMENTS