Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानभवनासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सकाळी विधानभवन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने स्वतःवर रॉकेल ओतून

महाराष्ट्राची आर्थिक अधिक सक्षम : मुख्यमंत्री फडणवीस
शेतकरी, बेरोजगारी अन् बीडच्या विकासावर खा.सोनवणेंनी संसदेत उठविला आवाज; लोकसभा अध्यक्षाविरूध्द आलेल्या अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थही केले मुद्देसूद भाषण
कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाचीमंत्री चंद्रकांत पाटील; 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी विविध कला पुरस्कारांचे वितरण

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सकाळी विधानभवन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्याला रोखले आणि संभाव्य अनर्थ टाळला.
सकाळच्या सुमारास विधिमंडळाच्या कामकाजाची तयारी सुरू असताना संबंधित तरुण अचानक विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आला. त्याने आपल्या जवळ असलेले रॉकेल अंगावर ओतण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरक्षा कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेत त्याला पकडले आणि त्याच्या हातातील रॉकेलची बाटली जप्त केली. त्यामुळे त्याने स्वतःला आग लावण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वाहनात बसवित असताना तो संतप्त अवस्थेत घोषणाबाजी करत होता. समाजावर अन्याय होत आहे, गरिबांना न्याय मिळत नाही, असे तो जोरजोरात सांगत होता. त्याच्या या घोषणांमधून व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून आले. तथापि, नेमक्या कोणत्या मागणीसाठी किंवा कोणत्या प्रश्‍नामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले आहे. तो नेमका कोणत्या जिल्ह्यातील आहे, तसेच त्याच्या कृतीमागील कारणे काय आहेत, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे विधानभवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधानभवन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्वलनशील पदार्थ घेऊन एखादी व्यक्ती प्रवेशद्वारापर्यंत कशी पोहोचली, याबाबतही प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेच्या व्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

COMMENTS